Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
The progress of the farmer

The progress of the farmer: नमस्कार मित्रांनो, भारत देशामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पारंपारिक पीक पद्धतीतून शेतकऱ्यांना कमी उत्पन्न मिळत होते. पारंपारिक पीक पद्धतीमध्ये निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतमाल बाजारात अतिशय कमी दरात जातो. शेतमालाला कमी दर मिळाल्यामुळे शेतकरी पारंपारिक पीक पद्धतीत बदल करून आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करत आहेत.

पीक पद्धतीत बदल केल्यामुळे आता शेतकरी मातीचे सोने करत आहेत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील आडस गावांमधील शेतकरी मुरली बाबुराव काळे यांनी आपल्या शेतामध्ये बदल करून लाखोंची कमाई केली आहे. आधुनिक पीक पद्धतीचा वापर करून त्यांनी तुती लागवड केली. त्याचबरोबर रेशीम उद्योग सुरू केला. त्यांनी या व्यवसायामधून आठ लाख रुपयांची कमाई केली. मुरली बाबुराव काळे हे शेतकऱ्यासाठी मार्गदर्शक ठरले.The progress of the farmer

मुरली यांनी शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने रेशीम शेती 2012 मध्ये सुरू केली. त्यांनी 30 गुंठे जमिन बटाईनी घेऊन त्यामध्ये तुतीची लागवड केले. दीड एकरच्या तुती पिकावर एका वर्षामध्ये 10 बॅच घेऊन आणि प्रत्येक बॅच मधून दीड क्विंटल एवढी रेशम कोष चे उत्पादन केले. मुरली यांना एका बॅच मधून 80 हजार रुपये मिळतात तर अशा दहा बॅच मधून त्यांना 8 लाखाची कमाई सहज होते.

1 वर्षात तुतीची लागवड केली तर ती 20 वर्ष राहते. पिकासाठी पाणी प्रमाणात असेल तरी चालते. रेशम तयार करणाऱ्या खुइन आळ्यांना 20 वर्ष पाला टाकावा लागतो. दरवर्षी उत्पादन घेण्याची गरज लागत नाही. त्यामुळे उत्पादनाचा खर्चही होत नाही. 20 वर्ष उत्पन्न देणारी रेशम शेती 10 वर्षात 300 रुपये प्रति किलो पेक्षा अधिक दर मिळतो. मुरली काळे यांच्या मते जास्त पाण्याची उपलब्ध असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करावी. आणि लाखो ची कमाई प्रत्येक महिन्याला करावी.The progress of the farmer

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *