Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Agricultural crops

Agricultural crops: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज अशा शेतकरी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत की, तो शेतकरी इंजिनीयर आहे परंतु त्याने लाल केळीची शेती करून 1.5 कोटीचे उत्पन्न कसे घेतले. याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

या इंजिनीअर तरुणीवर शेतकऱ्याचे नाव हे अभिजीत पाटील आहे. हा शेतकरी करमाळा तालुक्यातील रहिवासी असून या शेतकऱ्याने आता कमी खर्चात अधिक नफा देणारे आणखीन एक पीक म्हणून केळी आहे हे सिद्ध केले आहे. यामुळे या तरुण शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर लाल केळीची लागवड करून एक आदर्श निर्माण केला आहे.

या शेतकऱ्याला लाल केळीची लागवड करून किती रुपये नफा मिळाला याबद्दल माहिती पुढील प्रमाणे पाहुयात, अभिजीत पाटील या शेतकऱ्याने प्रती एकर 12 ते 15 टन इतके लाल केळीचे उत्पादन घेतले आहे. तर मित्रांनो आपण पन्नास रुपये किलो प्रमाणे विकली असे समजू यानुसार त्याने लाखो रुपयाचा नफा मिळवला. या शेतकऱ्याने तब्बल 30 एकर शेतात लाल केळीची लागवड केली आहे. यानुसार तो शेतकरी दहा महिन्यात 1.5 कोटीचे उत्पन्न मिळत आहे.

त्याचबरोबर अभिजीत पाटील या इंजिनीयर तरुण शेतकऱ्याने महाराष्ट्रात लाल केळी आणि इलायची केळीची लागवड केली आहे. त्याचबरोबर त्याच्या पहिल्याच प्रयत्नात त्याला खूप मोठे यश मिळाले आहे. त्याने त्याचा हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. माहितीनुसार, लाल केळीला बाजारामध्ये खूपच मागणी आहे यामुळे लाल केळी चे पीक घेऊन शेतकरी चांगले पैसे कमवू शकतात.Agricultural crops

शेतकरी वर्ग हा आता नवनवीन जातीच्या पिकाची शेती करताना आपल्याला देशात आहे. त्याचबरोबर कमी वेळात जास्त नफा देणारे कोणती पिके आहेत याचे देखील शोधात अनेक शेतकरी आहेत. लाल केळीचि शेती करून देखील कमी वेळात शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात हे या तरुण शेतकऱ्याने सिद्ध केले आहे.

शेतकरी मित्रांनो केळीची लागवड ही वर्षभरात केव्हाही केली जाते. परंतु गेल्या काही वर्षापासून केळीच्या पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा परिणाम सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर राज्यात आता केळी लागवडीचे क्षेत्र देखील झपाट्याने वाढत आहे.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या लाल केळीचे किंवा कोणत्याही इतर पिकाचे नुकसान झाले तर तुम्हाला सरकारकडून देखील नुकसान भरपाई मिळते. यामुळे तुम्ही लाल केळी या पिकाची शेती करून कमी खर्चात जास्त नफा मिळू शकतात.Agricultural crops

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *