Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Farming idea

Farming idea: नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जरा सतत तेच तेच पीक घेऊन कंटळला असाल आणि त्या पिकातून जास्त नफा मिळत नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची. या बातमीला पण पाहणार आहोत की जास्त नफा देणारे फळ कोणते आहे. त्याचबरोबर या फळाची लागवड कशी करायची? अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

कमी खर्च करून जास्त नफा देणारी कोणती पिके आहेत. याच्या शोधात अनेक शेतकरी असतात. त्याचबरोबर अनेक शेतकरी आता कमी खर्चा मध्ये जास्त नफा देणारी पिकाची लागवड देखील करत आहेत. त्याचबरोबर या जास्त नफा देणाऱ्या पिकाची लागवड करण्यासाठी सरकार देखील काही मदत करत आहे. कमी खर्चात जास्त नफा देणारे अनेक पिके आहेत. बीट या पिकाची लागवड करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. चला तर मग बीट या पिकाची लागवड कशी करायची? मार्केटमध्ये या पिकाला कसा भाव आहे? अशी माहिती खालील प्रमाणे पाहुयात.

शेतकरी मित्रांनो बीट हे फळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. यामुळे या पिकाला कोणत्याही हंगामात जास्त प्रमाणात मागणी असते. त्याचबरोबर या पिकाला सर्वाधिक मागणी ही हिवाळ्यामध्ये असते. हे फळ खाल्ल्याने अनेक रोग कमी होतात. त्याचबरोबर अनेक रोगांपासून वाचण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती देखील वाढते. चला तर मग बीट लागवड कशी करायची याची माहिती पाहुयात.Farming idea

बीटची लागवड करण्यासाठी आपल्याकडे चांगली जमीन असणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच या पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याकडे वालुकामय किंवा चिकन माती असणे गरजेचे आहे. कारण हे पीक फक्त या दोन मातीतच जास्त प्रमाणात येते. त्याचबरोबर तुमच्या शेतातील माती ही भुसभुशीत असणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही तुमची शेत व्यवस्थित नांगरणी करून घ्या.

  • नांगरणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कंपोस्ट हे खत शेतामध्ये टाका.
  • माती ठिसूळ झाल्यानंतर तुम्ही ती सपाट करावी
  • त्यानंतर तुम्ही बीटची पेरणी करू शकता
  • बीटची पेरणी करण्यासाठी तुम्ही 20 ते 25 सेमी च्या अंतरावर बियाणे तयार चरांमध्ये पेरावे
  • बीट या रोपांमधील अंतर हे जवळपास 8 ते 10 सेमी असणे आवश्यक आहे
  • त्याचबरोबर बीट या पिकाला तीन पान आल्यावर एका बाजूची निरुपयोगी गवत काढून टाका.

या पिकाची लागवड करून नफा किती मिळेल?

बीट दीड महिना ते दोन महिन्यापर्यंत तयार होते. पुसा चंद्रिका बीट या प्रकारच्या बियाचे बीट 55 ते 60 दिवसात तयार होते.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

या बेटाचे उत्पादन हेक्टरी 150 ते 200 क्विंटलपर्यंत होते. बाजारात उत्तम दर्जाच्या बीट आला तब्बल 4000 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव असतो. यामुळे शेतकरी या पिकाची लागवड करून फक्त दोन महिन्यात एक ते दोन लाखापर्यंत उत्पन्न करू शकतो.Farming idea

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *