Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Question

Question: कोंबडी आधी पृथ्वीवर आली की अंड हा प्रश्न अनेकांना मुद्दाम बुचकाळ्यात पाडण्यासाठी विचारला जातो. त्याचबरोबर या प्रश्नाची गंमत अशी आहे की, या प्रश्नांचे उत्तर आतापर्यंत खूप संशोधकांनी शोधले परंतु संशोधन लागले नाही. परंतु आता काही तज्ञांनी या प्रश्नांचे उत्तर शोधून काढले आहे. चला तर मग या प्रश्नाचे उत्तर काय आहे हे आपण पाहूयात.

मित्रांनो, लहानपणापासूनच आपल्याला नेहमी असं विचारण्यात येतं की कोंबडी आधी की अंड? काही व्यक्ती म्हणतात अंड आधी आहे. तर काही व्यक्ती म्हणतात कोंबडी आली असणार कारण कोंबडी पासूनच अंड तयार होत. मात्र काहीचे म्हणणे असे आहे की, अंड्या पासूनच कोंबडी तयार झाली आहे. यामुळे अंड आधी असणार आहे. चला तर मग शास्त्रज्ञांच्या मते या प्रश्नाचे उत्तर काय आहे हे आपण पाहू या.

कोंबडी आधी की अंड? या प्रश्नाचे उत्तर सापडण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले आहेत परंतु त्यांना अर्ध्यावरच प्रयत्न सोडून द्यावे लागले. मात्र काही दिवसापूर्वी युकेतील शेफिल्ड आणि वार्विक युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी याचा शोध सुरू केला होता. त्याचबरोबर अनेक प्रयत्नांच्या नंतर या शास्त्रज्ञांनी या प्रश्नाचे योग्य उत्तर शोधूनच दाखवले. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार, जगामध्ये अंड्या अगोदर कोंबडी आली होती.Question

चला तर मग उत्तर तर कोणीही सांगू शकता परंतु या मागील कारण काय आहे. हे सर्वांना माहीत असणे खूप गरजेचे असते. कारणही कुणीही सांगेल परंतु, ते कारण योग्य त्या ठिकाणी बसते का हे पाहणे खूप गरज असते. चला मग त्यांनी संशोधनानुसार काय स्पष्टीकरण आणि कारण दिले आहे आपण खालील प्रमाणे पाहूया.

या शास्त्रज्ञांनी संशोधनातून असे स्पष्ट केले आहे की, अंड्याच्या कवचेत एक ओवोक्लाइडिन नावाचं प्रोटीन असतं. याशिवाय अंड्याचं कवच बनू शकत नाही. हे प्रोटीन फक्त कोंबडीच्या गर्भाशयातील भागातच तयार होते. जेव्हा कोंबडीच्या गर्भाशयातील प्रोटीनचा अंड तयार होण्यासाठी उपयोग होतो तेव्हाच अंड निर्माण होते.

या महत्त्वपूर्ण आणि वैज्ञानिकनुसार, कोंबडी आधी की अंडे? या ग्रहण प्रश्नाचे उत्तर आता सापडले आहे. याचे उत्तर आता 100 टक्के कोंबडी आहे असे सर्वजण म्हणतात. या उत्तराला आता पुरावा देखील शास्त्रज्ञांनी सापडल्यामुळे हे उत्तर आता कोणीही बदलू शकत नाही. यामुळे आता सर्वांना मान्य करावे लागेल की जगात अगोदर कोंबडीच आली होती.Question

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *