Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Tractor Anudan Yojana

Tractor Anudan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. सरकारकडून पुन्हा एकदा 90 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर साठी अर्ज सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सरकारने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 डिसेंबर दिली आहे. या मुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज करून 90 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर खरेदी करावे.

चला तर मग या योजनेअंतर्गत नेमकं किती रुपये अनुदान मिळणार आहे? या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील? पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना अर्ज कोठे करावा लागणार आहे? अर्ज करण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतात? अशी संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहूयात.

90 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर ही योजना सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सरकार राबवत आहे. या योजनेसाठी नेमकं किती रुपये अनुदान मिळणार आहे हे आपण पुढील प्रमाणे पाहूयात. शेतकऱ्यांनो लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तब्बल 3 लाख 15000 रुपये अनुदान सरकार मार्फत दिले जाणार आहे.Tractor Anudan Yojana

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचा लाभ पुढील प्रमाणे पाहूयात, शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ हा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांना या योजनेच्या माध्यमातून मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तब्बल 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर म्हणजेच 23 डिसेंबर 2022 रोजी च्या अगोदर अर्ज करावा.

मित्रांनो, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक स्वयंसहायता बचत गट यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेमध्ये म्हणजेच ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी 10 टक्के रक्कम भरून ट्रॅक्टर खरेदी करावे.

शेतकरी मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नमोबुद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटातील शेतकऱ्यांनी विहित नमुना सह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन तिसरा मजला. या ठिकाणी जाऊन शेवटच्या तारखे अगोदर अर्ज दाखल करावा. तरच या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

शेतकरी मित्रांनो, वरी दिलेल्या 90 टक्के ट्रॅक्टर खरेदी साठी अनुदान सध्या फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी सुरू आहे. परंतु, सरकार आणखीन काही जिल्ह्यांमध्ये ही योजना लवकरच होणार आहे.Tractor Anudan Yojana

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *