Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Breking News

Breking News: भारत देश हा कृषिप्रधान देश मानला जातो आपल्या देशामध्ये शेतीवर 65 टक्के नागरिक अवलंबून असतात. यामुळे भारतात निसर्गाची कृपा असेल तर भारतात एवढा श्रीमंत देश कोणता होऊ शकत नाही. कारण निसर्गाने जर साथ दिली तर भारतात चांगले पीक येईल. आणि सर्व शेतकरी बांधव श्रीमंत होतील. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे सोन्यासारखे पीक मातीमोल होते. तरीदेखील या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भारतीय सरकारने काही आर्थिक मदत देण्याचे ठरवले आहे. मात्र ती मदत या पिकाच्या लागवड एवढ्या पैशाचे असते. नफा तर काहीच मिळत नाही मात्र तेवढाच शेतकऱ्यांना दिलासा मिळतो.

असे पाहिले की महाराष्ट्र मध्ये जास्त प्रमाणात ऊस लागवड केली जाते. ऊस लागवड करून शेतकरी भरघोस नफा मिळू शकतात. यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे चालला आहे. मात्र उसालाही जास्त काही भाव मिळत नाही. यामुळे आता शेतकरी बांधवांनी सरकारपुढे नवीनच मागणी केली आहे. ती मागणी म्हणजे सरकारला आता शेतकऱ्यांना पहिल्या उचलीला शेतकऱ्यांना 2500 रुपये तर अंतिम बिल हे 3100 रुपये त्वरित जाहीर करा ही मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

ही मागणी पूर्ण करणार असाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारला विनंती केली आहे. त्याचबरोबर आज सकाळी 11 वाजता मंगळवेढा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर माचणूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आणि जवळील भीमा या नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांनी गोळा होऊन आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांनी हे आंदोलन रस्ता रोको आंदोलन केले आहे. या आंदोलनामुळे तिथे वाहनांची खूपच गर्दी झाली आहे.

शेतकऱ्यांची ही मागणी कधी पूर्ण होईल याकडे सर्वच नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे लक्ष असेल. ऊसाचे भाव वाढावेत यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आंदोलने सुरू आहेत. शेतकऱ्यांना कधी ऊस दर वाढवून मिळेल. माहित नाही मात्र सरकारकडून ऊसदरवाढ मिळावे म्हणून शेतकरी आंदोलन करत आहेत.Breking News

मागील काही वर्ष शेतकरी बांधव हे कोरोना काळ असल्यामुळे कारखाना उसाला जो भाव देईल तो भाव शेतकरी मंजूर करून घ्यायचे. मात्र या वाढत्या महागाईमुळे आणि नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना कारखाना देत असलेला भाव परवडत नाही. यामुळे शेतकरी संघटना आता वाढीव दराने ऊस कारखान्यात घ्या अशी विनंती करून आंदोलन करत आहेत.

तरी राज्यातील सर्व शेतकरी बांधव एकजूट झाले आहेत आणि भाव वाढवून मिळावा यासाठी लढत आहेत. शेतकऱ्यांना लवकरच भाववाढ मिळेल आपण अशी अपेक्षा ठेवू शकतो. कारण खरंच आता दोन वर्षात खूपच महागाई झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढत चालला आहे. हा बोजा कमी करण्यासाठी कारखान्यांना ऊस भाव वाढ द्यावा लागणार आहे.Breking News

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *