Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Government scheme

Government scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना काय आहे? या योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात? या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे? अर्ज कोठे करायचा? या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या नागरिकाला किती रुपये मिळणार? अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

सरकारतर्फे गोरगरीब नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. त्यातच आता नागरिकांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत काही आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेबद्दल आपण या बातमीत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ही माहिती आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा.

ज्या नागरिकांची परिस्थिती खूपच खराब आहे. अशा नागरिकांना दारिद्र रेषेखालील नागरिक म्हणून ओळखले जाते. या नागरिकांसाठी सरकारने आर्थिक मदत देणाऱ्या योजना राबवत आहेत. चला तर मग राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजना काय आहे याबद्दल माहिती पाहुयात.Government scheme

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना काय आहे याबद्दल माहिती.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य ही योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला अर्थसहाय्य म्हणून या योजनेअंतर्गत 20 हजार रुपये दिले जाणार आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
  1. मयत व्यक्तीचे आधार कार्ड
  2. वारस प्रमाणपत्र
  3. अर्जदाराचे आधार कार्ड
  4. अर्जदाराचे बँक पासबुक
  5. मृत्यू दाखला
  6. इत्यादी कागदपत्रे लागतात.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करावा?

मयत व्यक्तीच्या वारसदाराने वीस हजार रुपये अर्थ साहाय्य मिळवण्यासाठी तलाठी, तहसीलदार, तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज केला पाहिजे. विशेष म्हणजे मयत व्यक्तीच्या वारसाने तीन वर्षाच्या आत तहसील किंवा वर दिलेल्या कोणत्याही ठिकाणी आर्थिक साहाय्य मिळवण्यासाठी अर्ज केला पाहिजे. यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत 20 हजार रुपये दिले जातील.

 

या योजनेचा लाभ कोणत्या नागरिकांना मिळणार?

मित्रांनो दारिद्र रेषेखालील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबांतील म्हणजेच त्या व्यक्तीच्या आपण त्याने किंवा पत्नीने अर्ज नमूद केला तर त्या कुटुंबाला वीस हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.Government scheme

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *