Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
IPL 2024 Schedule

IPL 2024 Schedule: नमस्कार मित्रांनो, इंडियन प्रीमियर लीग आयपीएल ही निःसंशयपणे भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आहे. बीसीसीआयने आयोजित केलेली ही ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट लीग भारताबरोबरच परदेशातही खूप लोकप्रिय आहे.

देशातील करोडो क्रिकेटप्रेमी आयपीएलच्या पुढच्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलचा सतरावा हंगाम कधी सुरू होणार, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या अनुषंगाने एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या कामाची बातमी समोर येत आहे.

खरंतर दरवर्षी होणारी ही स्पर्धा क्रिकेट चाहत्यांची खास पसंती असते. अशा परिस्थितीत जानेवारी-फेब्रुवारी महिना संपल्यानंतर आयपीएल कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होत असतो. अशा परिस्थितीत मीडिया रिपोर्ट्समधून पुढच्या सीझनची महत्त्वाची माहिती समोर येत आहे.IPL 2024 Schedule

मिळालेल्या माहितीनुसार, IPL 2024 या वर्षी मार्च महिन्यात सुरू होणार आहे. आयपीएल 2024 चा पहिला सामना 22 मार्च 2024 रोजी होणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. एवढेच नाही तर आयपीएलचा शेवटचा सामना 26 मे 2024 रोजी होणार असल्याचा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

मात्र बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आयपीएलचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. पण मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की यावर्षी आयपीएल 22 मार्चपासून सुरू होणार आहे आणि शेवटचा सामना 26 मे रोजी होणार आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाची आयपीएल भारताबाहेर होणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. यामुळे यंदा आयपीएल भारताबाहेर होणार का? हे देखील पाहणे खूपच गरजेचे असणार आहे.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

तथापि, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की आयपीएल भारताबाहेर खेळली जाणार नसून यावर्षी आयपीएल आपल्या देशातही खेळली जाईल. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून, सरकारशी चर्चा करून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे.IPL 2024 Schedule

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *