Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Land Subsidy

Land Subsidy: सरकार नेहमीच नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणते आणि त्या योजना राबवते. या सरकारी योजना देशातील तसेच राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील असते.

दरम्यान, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबातील लोकांना आणि भूमिहीन शेतमजूरांना उत्पन्न मिळवून देण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे.Land Subsidy

जमिनीसाठी 100 टक्के अनुदान

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतून 100 टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून देण्यावर सरकार भर देत आहे. या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट 2018 पासून 100% जमीन अनुदान देऊन शेतजमीन उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये लाभार्थ्याला 4 एकर शेतजमीन किंवा 2 एकर बागेची जमीन दिली जाते.

या योजनांच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील 202 शेतकऱ्यांना आतापर्यंत 570 एकर शेतजमिनीचे वाटप करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाही जमीन वाटपासाठी खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.

Land Subsidy Yojana: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजूरांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे वरील लोकांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळण्यासाठी जमीन अनुदान दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

1) या योजनेच्या लाभासाठी अर्ज करणारी व्यक्ती अनुसूचित जाती केव्हा नव-बौद्ध समाजातील असणे आवश्यक आहे.

2) महत्त्वाचे म्हणजे, योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असणे आवश्यक आहे.

3) या योजनेसाठी विधवा महिलांना प्राधान्य दिले जाते.

4) या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *