Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Farming news

Farming news: भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सहाजिकच शेतीवर अवलंबून आहे. शेती ही भारतामधील 65 टक्के पेक्षा अधिक नागरिक करत असतात. यामुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे.

शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने तननाशक ग्लायफोसेट आणि त्यांच्या डेरिव्हेटीव्हजच्या वापरावर बंदी घातली आहे. यामागील एक कारण म्हणजे, या रासायनाचा वापर केल्यामुळे मानव आणि प्राण्यांच्या आरोग्यावर धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे मोठा परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला आहे.Farming news

परंतु संघटना AGFI ने जागतिक अभ्यास आणि नियामक संस्थांच्या समर्थनाचा हवाला देत सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. ग्लायफोसेट आणि त्यांची फॉर्मुलेशन मोठ्या प्रमाणावर नोंदणीकृत आहेत. त्याचबरोबर सध्या यूनाइटेड स्टेट् आणि युरोपियन युनियनसह 160 पेक्षा जास्त जागा मध्ये वापरले जातात.

भूतकाळाचा विचार केला असता. जगभरातील शेतकरी हे जवळपास चाळीस वर्षाहून अधिक कालावधीपासून या तण नियंत्रणासाठी रसायनाचा वापर करत असलेले आहेत. आणि तेव्हापासून व्यक्ती सुरक्षित आहेत. परंतु 25 ऑक्टोंबर रोजी कृषी मंत्रालयाने हे रसायन वापरण्यावर बंदी घातली आहे. याचबरोबर ते असे देखील म्हणाले की कीटक नियंत्रण करण्यासाठी कीटक नियंत्रण ऑपरेटर म्हणजेच पीसीओ हे तणनाशक वापरू शकता.Farming news

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *