Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Land record

Land record: मित्रांनो बदलत्या काळात शेतजमिनीचे भाव वाढत चालले आहे. तरीही नागरिक जमीन घेऊन आपली गुंतवणूक करतात. जमीन घेऊन ठेवली तर ते दुसऱ्या पिढीला उपयोगी पडते. शेती जरी विकत घेतली तरी शेती कोणी जास्त करत नाही तर ती शेती कोणी उद्योगधंद्यासाठी उपयुक्त करतात तर कोणी घर बांधण्यासाठी. शेती घेण्याचे मूळ कारण म्हणजे आपला पैसा त्यामध्ये गुंतून राहतो. ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना मोठे मानले जाते. जमिनी विकत घ्यायचे म्हटले तर सरकारी भाव काय आहेत याची सर्वांना जाणीव नसती.

आपल्याला जी जमीन खरेदी करायची आहे त्या भागातील सरकारी दर कसा असेल मला माहिती असेल तर आपण त्या भागातील स्थितीचा अंदाज आपण वर्तवू शकतो. पाहूया की आपण जमिनीचा दर काय आहे तो

आता सर्वांनाच वाटते की सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने व्हावे. सरकारचा आहे तो असतो की शेती विषयक माहिती ऑनलाईन पद्धतीने सर्वांना मिळावी ज्याप्रमाणे 7/12,8 अ हे ऑनलाईन द्वारे काढण्यात येत आहे. तसेच शेत जमिनीचा दरही ऑनलाइन पद्धतीने करता यावा जेणेकरून सर्वांना सरकारचा जमिनीचा दर काय आहे हे माहिती होईल व कोणतेही गैरसमज होणार नाही. सरकारी तर आपण गुगल वेबसाईटवर जाऊन तिथे igrmaharashtra. gov.in असे सर्च करून आपण पाहू शकतो.

 

बाजार मूल्य दर पत्रक नावाचे पेज ओपन होते या पेजवर महाराष्ट्राचा नकाशा असतो त्यामध्ये आपल्याला च्या जमिनीचा सरकारी दर पहायचा आहे. ती जमीन कोणत्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा निवडायचा आणि कोणत्या वर्षामध्ये किती भाव होता यावर क्लिक करायचं. या भागामध्ये आपल्याला जमीन खरेदी करायची आहे त्या भागातील गावाचा जिल्हा तालुका निवडायचा त्यानंतर गावतील शेत जमिनीचा भाव आपल्याला दिसतो. यामध्ये जमिनीचे भाव आपल्याला दिलेले असतात. ते हेक्‍टरी मध्ये असतात. पण त्यानुसार एकरी भाव काय आहेत याचा अंदाज आपल्याला काढता येतो.

काही जमिनी आशा असतात की जर सरकारी जमिनीचा दर आपल्याला माहिती असेल तर आपण या जमिनीचा दर काढू शकतो. यामध्ये बागायती जमीन, जिरायती जमीन, तसेच एमआयडीसी अंतर्गत येणारी जमीन, महाराष्ट्र महामार्गलगत येणारी जमीन, या जमिनी अशा आहेत. की जर जमिनीचा सरकारी दर माहिती असेल तर ह्या जमिनीचा दर आपण सहज काढू शकतो.Land record

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *