Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Test Mach Highlights

Test Mach Highlights: नमस्कार मित्रांनो, फलंदाज आणि गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धची दुसरी कसोटी 106  धावांनी जिंकली. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली, आता भारताने विजयासह गुणसंख्या स्थिरावली आहे. दुसऱ्या डावात आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 3 तर मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. मात्र चौथ्या डावात इंग्लंडने चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. भारताने दुसऱ्या कसोटीत पहिल्या कसोटीतील काही चुका टाळल्या आणि विजय मिळवला.Test Mach Highlights

त्याचबरोबर मित्रांनो, भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. भारताकडून पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावले. त्याने कारकिर्दीतील पहिल्या द्विशतकात 209 धावा केल्या आणि भारताने पहिल्या डावात 396 धावांची मोठी धावसंख्या उभारली. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंडचा डाव अवघ्या 253 धावांवर संपला.

जसप्रीत बुमराहच्या वेगवान गोलंदाजीसमोर इंग्लंडचे फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. बुमराहने पहिल्या डावात 6 विकेट घेतल्या होत्या. कुलदीप यादवने 3 विकेट घेतल्या होत्या. यासह आता भारताने दुसरी टेस्ट मालिका जिंकली आहे.. त्याचबरोबर या दुसऱ्या टेस्टची संपूर्ण हायलाइट्स खालील प्रमाणे तुम्ही पाहू शकता…

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

दुसऱ्या टेस्टची संपूर्ण हायलाइट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *