Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Use of coconut oil

Use of coconut oil: भारतात खोबऱ्याचं तेल केस आणि त्वचेसाठी वापरले जाते. खोबऱ्याच्या तेलाचा वापर केल्यामुळे केस आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. मग खाज सुटल्यास त्यावर लावायचं असो वा कोरडी त्वचेवर लावणं असो. आम्ही प्रत्येक उपायासाठी खोबरेल तेल वापरतो. खोबऱ्याच्या तेलामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि फॅटी ॲसिड असतात. पण अनेकदा जास्त खोबऱ्याचं तेल वापरल्याने केस गळणे किंवा कोंड्याची समस्या त्वचेची समस्या उद्भवते. 

खोबरेल तेलात कापूर आणि लवंग मिसळा

जर तुम्हाला खोबरेल तेलाचे गुणधर्म आणखी वाढवायचे असतील तर खोबऱ्याच्या तेलात कापूर आणि लवंगा चे मिश्रण करून लावल्याने कापूरमध्ये अँटी-फंगल तसेच मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे केस आणि त्वचेला फायदा होतो यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल घ्या, त्यात कापूर आणि लवंगा घाला. 5 मिनिटांनी गॅस बंद करा. तेल थंड झाल्यावर चाळणीतून गाळून हवाबंद डब्यात ठेवा.Use of coconut oil

केसांमधील कोंडा नाहीसा होईल

खोबरेल तेलात कापूर आणि लवंग यांचे मिश्रण लावल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. कोंडा कमी करण्यासाठी तुम्ही हे तेल वापरू शकता. या तेलाच्या गुणधर्मामुळे टाळू स्वच्छ होतो. मुख्यतः कापूर आणि लवंग केसांची छिद्रे स्वच्छ करतात. जे केस वाढण्यास मदत करते. तसेच केसांमध्ये कोंडा पुन्हा तयार होत नाही.

त्वचेसाठी फायदेशीर

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

त्वचेवर घरगुती तेल लावल्याने केवळ मुरुमांचे डागच नाही तर त्वचेच्या इतरही अनेक समस्या दूर होतात. तसेच कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळते. हे सोरायसिस आणि एक्जिमाच्या उपचारांमध्ये देखील फायदेशीर आहे. मुख्य म्हणजे या तेलामुळे त्वचा डागमुक्त दिसते.Use of coconut oil

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *