Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Zilla Parishad Yojana list

Zilla Parishad Yojana list: नमस्कार शेतकरी मित्रांनो, जिल्हा परिषदेमार्फत सरकार विविध योजना राबवित आहे. या योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना दिला जात आहे. या जिल्हा परिषदेमार्फत जवळपास 8 ते 9 योजना 90 टक्के ते 100 टक्के अनुदानावर राबवल्या जात आहेत.

चला तर मग जिल्हा परिषद मार्फत कोण कोणत्या योजना राबवल्या जात आहेत पाहुयात,

 1. पिठाची गिरणी योजना
 2. शिलाई मशीन योजना
 3. तेलंगणा योजना
 4. सोलार वॉटर हिटर योजना
 5. मिरची कांडप योजना
 6. तुषार संच योजना
 7. झेरॉक्स मशीन वाटप योजना
 8. सायकल वाटप योजना
 9. दिव्यांगांना मिनी पिठाची गिरणी योजना

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये अर्ज सादर करावा लागतो. काही जिल्ह्यांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची सोय देखील उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये जावे लागते आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो.Zilla Parishad Yojana list

शेतकरी मित्रांनो आता आपण पाहुयात की वरील योजना कोणत्या जिल्ह्यात किती टक्के अनुदानावर राबविल्या जात आहेत.

पुणे जिल्हा परिषद मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज सुरू आहेत

पुणे जिल्हा परिषद मध्ये पुढील प्रमाणे योजनांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.1) पिठाची गिरणी 2) शिलाई मशीन 3) सोलर वाटर हीटर योजना 4) तेलंगणा योजना या योजना पुणे जिल्हा परिषद मध्ये सुरू असून यासाठी पात्र उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

जालना जिल्ह्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने 100 टक्के अनुदानावर काही योजना सुरू आहेत त्या योजना खालीलप्रमाणे दिले आहेत.

 1. मागासवर्गीयांना मोफत मिरची कांडप यंत्र योजना
 2. दिव्यांगांना मिनी पिठाची गिरणी वाटप योजना
 3. तुषार सिंचन पुरवणे योजना
 4. दिव्यांगांना झेरॉक्स मशीन वाटप योजना
 5. दिव्यांगांना स्वचालित सायकल वाटप योजना
 6. मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन वाटप योजना
 7. मागासवर्गीयांना मिनी पिठाची गिरणी योजना

जालना जिल्ह्यामध्ये वरील सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. वरील सर्व योजना 100 टक्के अनुदानावर सुरुवात आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात कोणकोणत्या योजना सुरू आहेत ते आपण पाहूयात

बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद मार्फत मागासवर्गीय महिलांसाठी शिलाई मशीन शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी शेती पूर्वक महत्त्वपूर्ण योजना राबवली जात आहे. ती योजना म्हणजेच पाच एचपी विद्युत मोटार पंप 100 शंभर टक्के अनुदानावर लाभार्थी शेतकऱ्याला मिळणार आहे.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *