Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Aadhar Card New Update

Aadhar Card New Update: आपण पाहतो या संगणक काळामध्ये आधार कार्ड एक अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र बनलेला आहे. आधार कार्ड शिवाय आपण कोणत्याही योजनेचा त्याचबरोबर नवनवीन निघालेल्या सुविधांचा लाभ घेऊ शकत नाही. आपल्याला कोणत्याही सरकारी नोकरीचा त्याचबरोबर योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याकडे आधार कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. आपण पाहतो सध्याच्या या काळामध्ये लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत आधार कार्ड असणे गरजेचे आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात असा प्रश्न येत असेल की लहान मुलांचे आधार कार्ड हे नंतर काढले तरी चालेल, परंतु आता तसे नाही त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश शाळेमध्ये करायचा असेल तर आपल्याला लगेचच आधार कार्ड ची गरज लागते.

आपल्याला जर आपले बँक खाते उघडायचे असेल त्याचबरोबर महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल आणि शाळेमध्ये देखील प्रवेश घ्यायचा म्हणलं तरी सुद्धा आधार कार्ड खूप महत्त्वाचं आहे. सध्याच्या या काळामध्ये आधार कार्ड शिवाय आपण कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. एवढेच नाही तर आपल्याला एखाद्याची जमीन विकत घ्यायची असेल, त्याचबरोबर आपल्याला आपल्या नावावरती जागा घ्यायची असेल. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला आधार कार्ड ची जास्तीत जास्त गरज भासते.Aadhar Card New Update

आधार कार्ड हे सध्याच्या काळामध्ये सगळीकडेच गरजेचे आहे. म्हणूनच आपण आज अशा एका अपडेट बद्दल माहिती पाहणार आहोत, ती म्हणजेच की आधार कार्ड हे अपडेट करावे लागते तर ते आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपल्याला किती रुपये लागणार आहेत. हे आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.

आता नवीन नियमानुसार आधार कार्ड हे अपडेट करून घेणे बंधनकारक आहे. जर आपण आपले आधार कार्ड अपडेट करून घेतली नाही तर आपल्याकडे आधार कार्ड असून सुद्धा ते आधार कार्ड कोणत्याही कामासाठी उपयोगी पडणार नाही. ओळखपत्र म्हणून या आधार कार्ड ला ओळखले जाते. भारत सरकारने स्वीकारलेले आधार कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आपण पाहतो की देशातील सर्व व्यक्तीसाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचं कागदपत्र बनवण्यात आलेल आहे.(Aadhaar card is an important document)

आधार कार्ड बनवत असताना जर आपल्या पाठीमागे थोडीशी गरबड असेल तर त्या टायमिंगला आपल्याकडून काही माहिती चुकीची पडते ती माहिती आपण बदलू शकतो. आधार कार्ड बनवत असताना आपल्याला आपले नाव,लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि मोबाईल नंबर ही ही माहिती भरावी लागते. आधार कार्ड बनवत असताना जर आपल्याकडून या माहितीमध्ये काही चुकीची माहिती दिली असेल तर आपण ती नंतर अपडेट करण्याची सुविधा सुद्धा आता निघालेली आहे.

आधार कार्ड मधील माहिती अपडेट करण्यासाठी आपल्याला किती रुपयांचा खर्च येतो. हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात पडत असेल, तर आपण या लेखात पाहणार आहोत की नेमकं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी किती रुपये खर्च करावे लागतात.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

आपल्याला जर आपल्या आधार कार्ड मधील नाव जन्मतारीख पत्ता आणि लिंग यामध्ये काही बदल करायचा असेल म्हणजेच अपडेट करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला 50 रुपये फीस भरावी लागते. जर आपल्याला आपल्या आधारचे बुबुळ आणि फिंगरप्रिंट अपडेट करायचे असेल तर आपल्याला 100 रुपये फीस भरावी लागते. यावेळी जर आपण आपल्या मुलांच्या बायोमेट्रिक मध्ये अपडेट करत असलोत तर त्यावेळी त्यासाठी काहीच फीस भरावी लागणार नाही. आपण जर आपले आधार कार्ड अपडेट करत असतो आणि त्यावेळी जर आपल्याकडून जास्त फीस घेण्यात येत असेल तर आपण त्याची तक्रारही करू शकता. तक्रार करण्यासाठी 1947 या नंबर वर कॉल करावा लागेल. आधार कार्ड आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही माध्यमातून करू शकतो.Aadhar Card New Update

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *