Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Diabetes information

Diabetes information सध्याच्या या बदलत्या काळामध्ये आपण पाहतो की बऱ्याचशा व्यक्तींना मधुमेह या आजारांचा त्रास होत आहे त्याचबरोबर अति वजन व उच्च रक्तदाब हे आजार देखील होत आहेत. असे आजार असल्यास आपण कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये. या आजाराशी संबंधित सतत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरं ऋतुजा दिवेकर यांनी दिलेली आहेत ते आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.

आपण पाहतो की देशभरात मधुमेह अतिवजन व रक्तदाब यासारख्या समस्यांचा त्रास होत असणारे भरपूर व्यक्ती आहेत. या तीनही समस्या वर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यात काही बदल करावे लागतात ते बदल केल्यास या समस्यांचा त्रास होणार नाही. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये कोणते बदल करायला पाहिजे ते आपण खाली पाहणार आहोत.

उच्च रक्तदाब व मधुमेह असल्यास केळी खावी की नाही? असा प्रश्न अनेक व्यक्तीच्या मनात पडत असतो. तर आपण आज इथे पाहणार आहोत की मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तीने केळी खायला पाहिजे की नाही. ऋतुजा दिवेकर यांच्या मते सर्व फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, फ्रॅक्टोजाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांना केळी खाण्याची परवानगी ही अमेरिकन डायबिटीज असोसिएशन यांनी दिलेली आहे. परंतु भारतीय डॉक्टरांच्या मनात आजही केळी या फळाबद्दल शंका आहे. भारतीय डॉक्टरांना केळीच्या सेनाबाबत शंका आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी केळी खाल्ली नाही पाहिजे असे अनेक आहार तज्ञही सांगतात. कारण केळी या फळांमध्ये खनिजांचे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे केळी खाण्याचा परिणाम हा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींवर होऊ शकतो तसेच केळी या फळाचा फायदा उच्च दाब टाळण्यासाठी होतो. म्हणून ज्या व्यक्तींना मधुमेह या समस्याचा त्रास आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये केळीचा समावेश करू नये.

बऱ्याच व्यक्तींचा प्रश्न हा असा आहे की कॉफी किंवा चहा मध्ये साखर घ्यावी की नाही? डायजेस्टिव्ह बिस्किट खायला पाहिजेत का? ऋतुजा दिवेकर यांच्यामध्ये आपण चहा आणि कॉफीमध्ये साखर घेतली तरी चालेल परंतु बिस्किट खाऊ नये. आपण कॉफी किंवा चहा यामध्ये एक छोटा चमचाभर साखर ही घेऊ शकतो. कारण कॉफी किंवा चहा मधील साखर ही आपण स्वतः नियंत्रित ठेवू शकतो. आपण पाहतो की बिस्किट हे एक फूड आहे. परंतु बिस्किटामध्ये देखील साखर मिक्स केली जाते त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी बिस्किटाचे सेवन करू नये. आपल्याला जर मधुमेह या आजारापासून दूर राहायचे असेल तर आपण किती प्रमाणात खावे त्याचबरोबर कोणते अन्न खावे व कोणती फळे खावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी पेरू, सफरचंद, जांभूळ, बोर आणि पपई या फळाचे सेवन करावे.

ज्या व्यक्तींना मधुमेह या आजाराचा त्रास आहे त्यांनी तो त्रास कमी करण्यासाठी चालणे हा त्याच्यावरील सर्वोत्तम व्यायाम आहे का? हा प्रश्न अनेक व्यक्तींच्या मनात येत असतो. आपण पाहतो की बाराच्या व्यक्तींना असे वाटते दररोज चालणे हे आपल्या आरोग्यासाठी पुरेसे आहे. नुसत्या चालल्याने मधुमेह हा आजार कमी होत नाही तर त्यासाठी आपण खाण्याकडे सुद्धा लक्ष केंद्रित करावे लागते. शरीरातील स्नायू मजबूत राहावे म्हणून आपण चाललो तरी चांगले आहे. शरीरासाठी स्नायूंच्या मजबुतीवर काम करणे गरजेचे आहे. आपल्या शरीरातील शक्ती कमी होणे हे इन्सुलिनच्या क्षमतेशी निगडित असते त्यामुळे मसल्स ट्रेनिंग करणे गरजेचे आहे. चालण्यापेक्षा मसल्स ट्रेनिंग केल्याने शरीरातील शक्ती नियंत्रित राहण्यास मदत होते. आपण जर असे करत राहिलो तर आपली मधुमेह या समस्येपासून सुटका होईल.

आपण आपल्या आहारात तूप घेतल्यास शरीरातील फॅट्स वाढतात का? असा प्रश्न बऱ्याच व्यक्तींच्या मनामध्ये पडत असतो. आज आपण या प्रश्नाचे उत्तर येथे पाहणार आहोत. नारळ व तूप या दोन्हीमध्ये फॅटी ऍसिड असतात. परंतु या नारळ आणि तुपामध्ये असणारे फॅट्स आपल्या शरीराला लाभदायक ठरू शकतात. त्यामुळे मधुमेह चा त्रास असणाऱ्या व्यक्तींना ते आवश्यक इन्सुलिन शरीराला मिळते, तसेच हृदयाचे विकारही टळतात. आपण पाहतो की सध्याच्या या काळामध्ये मधुमेह या समस्येला त्रस्त झालेले अनेक व्यक्ती आहेत परंतु त्यावरती अजून एक उपाय म्हणजेच ज्या व्यक्तींना मधुमेह ही समस्या आहे त्यांनी तुपाचे सेवन करावे. तुपाच्या सेवनाने पचनक्रिया सुद्धा सुरळीत होत असते त्याचबरोबर आपल्या शरीरातील आतड्याच्या त्वचेची स्वच्छता होते.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्या व्यक्तीने वरी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टींचे पालन करावे.त्याचा फायदा आपल्या शरीरासाठी होऊ शकतो, त्याचबरोबर आपण मधुमेह या समस्येला नियंत्रित करू शकतो. मधुमेह या आजाराची समस्या आता दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे.Diabetes information

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *