Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Dry fruits

Dry fruits आपण पाहतो की हिवाळ्यामध्ये आपण जास्त थंड पदार्थ खाऊ शकत नाही कारण त्यामुळे आपण आजारी पडू शकतो. हिवाळ्यामध्ये कोणते पदार्थ खाल्लेले चांगले असतात त्याचबरोबर ते किती प्रमाणात खावे लागतात हे आपल्याला माहित नसते त्यामुळे आपण आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाही. परंतु आपण कोणतीही गोष्ट खाण्याआधी थोडासा विचार केला पाहिजे की ही गोष्ट यावेळी खाल्ली तर चालेल का किंवा त्या पदार्थाविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेणे गरजेचे असते. आपण आता पाहणार आहोत की हिवाळ्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि सुकामेवा खात असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की हिवाळ्यामध्ये जर ड्रायफ्रूट्स खायचे म्हणलं तर कोणत्या वेळी खायला पाहिजे त्याचबरोबर किती प्रमाणात खायला पाहिजे. तर आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की ड्राय फ्रुट्स आणि सुकामेवा खाताना कोणत्या चार गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

आपण पाहतो की थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला जरा जास्त भूक लागते, आपण तीन टाइम जेवण करतो परंतु तरीही आपल्याला मधल्या वेळेत काहीतरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी आपण असे ड्रायफूट सुकामेवा यापैकी काहीही खाऊ शकतो. असं म्हणतात की थंडीच्या या दिवसांमध्ये आपण जर योग्य वेळी योग्य आहार घेतला तर आपली तब्येत त्याचबरोबर आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते. त्यामुळे आपण आपला आहार कसा घेतला पाहिजे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आपण पाहतो की हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला ऊर्जा मिळावी असे काही पदार्थ आपण खाल्ले पाहिजे. त्याचप्रमाणे घेतलेल्या पदार्थांचे पोषण चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्यामुळे आपण आहारात काही बदल करत असतो. आपण आपल्या आहारात बदल करत असताना नेमका कसा करायचा हे सुद्धा आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. आपण पाहतो हिवाळ्याच्या दिवसात आपण आहारात जो बदल करतो तो म्हणजेच की आपल्या शरीराला ज्या पदार्थापासून उष्णता मिळते असे पदार्थ खाण्यास आपण सुरुवात करतो. हिवाळ्यामध्ये आपण अशा पदार्थाचे सेवन केल्यास आपल्या शरीराला उष्णता मिळतेच त्याचबरोबर आपल्या शरीर हे तंदुरुस्त राहते. तसेच आपण हिवाळ्यामध्ये ताकद वाढणारे आणि गरम पदार्थही खातो.

आपण पाहतो की हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गरम व उष्ण त्याचबरोबर ताकद देणारे पदार्थ आपण आपल्या आहारात घेतले पाहिजे. तर ते पदार्थ कोणते आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. सुकामेवा, डिंकाचे लाडू, तिळ आणि गुळ या गोष्टींचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये केला पाहिजे.

थंडीच्या काळात लहान मुलांना तसेच सगळ्यांनाच सुकामेवा खाण्याचा तज्ञाकडून सल्ला दिला जातो. सुकामेवा खाण्याचे आपल्या शरीरासाठी भरपूर फायदे आहेत त्यामुळे आपण हिवाळ्यात सुकामेवा त्याचबरोबर ड्रायफूड खाल्ले पाहिजे. आपण पाहतो की काही वेळा आपण जो आहार घेतो त्या आहाराचे फायदे जसे म्हणावे तेवढे भेटत नाहीत. परंतु तरीसुद्धा आहारावर नियंत्रण असणे त्याचबरोबर कोणत्या वेळी काय खाल्ले पाहिजे हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. आपल्याला तज्ञाकडून सल्ला मिळतो की सुकामेवा आणि ड्रायफ्रूट्स याचे सेवन केले पाहिजे परंतु हे ड्रायफ्रूट्स आणि सुकामेवा नक्की कसा घ्यायचा व त्याचे फायदे काय होतात हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे.

आपण हे ड्रायफ्रूट्स आणि सुकामेवा कोणत्या वेळेला खायला हवा, त्याचबरोबर कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात घ्यावा याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला आयुर्वेद तज्ञ डॉक्टर दीक्षा भावसार या अतिशय महत्त्वाची माहिती देतात ती आपण या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

सुकामेवा आणि ड्राय फ्रुट्स खाण्याबद्दल आयुर्वेद तज्ञ दीक्षा भावसार यांचे नेमके मत काय आहे हे आपण येथे पाहणार आहोत. त्यांच्या मते सुकामेवा आणि ड्रायफ्रूट्स खात असताना चार गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत त्या खालील प्रमाणे-
आपण पाहतो थंडीमध्ये आपल्याला सुकामेवा खायला पाहिजे असे बरेच जण सांगतात, परंतु तो आपण कसा खावा याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे तर सुकामेवा यामध्ये फायबर, फॅट्स आणि प्रोटीन असे काही घटक असतात. तसेच सुकामेवा हा उष्ण असतो. हा उष्ण असल्यामुळे आपण त्याला पाण्यात सहा ते आठ तास भिजवायला पाहिजे आणि नंतरच तो खाल्ला पाहिजे. कारण पाण्यात भिजवल्यानंतर त्यात असणारी उष्णता निघून जाते आणि त्यामुळे ते आपल्या पचनास मदत करते. सुकामेवा हा पचण्यासाठी काही प्रमाणात जड असतो त्यामुळे सुकामेवा कधीही न भिजवता खाऊ नये.

आपल्याला सुकामेवा खाण्याची इच्छा होते, परंतु कधीकधी आपण तो भिजत घालायचा विसरून जातो, तर त्यावेळी आपण हा सुकामेवा कसा खायचा याबद्दल माहिती देखील आपण पाहणार आहोत. आपण पाहतो की आपल्या पाठीमागे जर काही गडबड असेल तर आपण सुकामेवा भिजत घालायचा विसरून जातो आणि आपल्याला किंवा लहान मुलांना त्यावेळी सुकामेवा खाण्याची खूप इच्छा होते. अशावेळी आपण तो कडई मध्ये किंवा तव्यावर भाजून खाल्ला तरी चालेल कारण ड्रायफ्रूट्स हे भाजून घेतले तरी सुद्धा ते पचायला हलके होतात. सुकामेवा आणि ड्राय फ्रुट्स आपण भिजत घालून खाल्ले तरीसुद्धा पचायला सोपे जाते आणि भाजून खाल्ले तरीपण पचायला हलके जाते. त्यामुळे आपण सुकामेवा आणि ड्रायफ्रूट्स घेताना या पद्धतीने घेतला पाहिजे.

सुकामेवा आणि ड्राय फ्रुट्स नेमका कोणत्या वेळेत घ्यायला पाहिजे. याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. सुकामेवा त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स आपण सकाळी उठल्या उठल्या किंवा दुपारी 11 ते 12 वाजता नाहीतर संध्याकाळी 4 वाजता या वेळेमध्ये खाल्ले तरी चालतात. आपण वरी सांगितलेल्या वेळेप्रमाणे जर सुकामेवा आणि ड्रायफूट खाल्ले तर आपल्याला मधल्या वेळात काहीही खाण्याची इच्छा होते. त्यामुळे आपण सुकामेवा आणि ड्रायफ्रूट्स हे सकाळच्या वेळी त्याचबरोबर 4 वाजता खाल्ले तरी चालतात.

सुकामेवा आणि ड्राय फ्रुट्स हे खाण्याची वेळ आपण पाहिलेले आहे. त्याचबरोबर एका दिवसात आपण ड्रायफ्रूट्स हे किती प्रमाणात घेतले पाहिजे हे आपण जाणून घेऊ. रोज मूठभर सुकामेवा खाण्यासाठी कोणतीच अडचण नाही परंतु त्या व्यक्तीला पचनाशी संबंधित तक्रारी नसल्या पाहिजेत त्याचबरोबर त्या व्यक्तीला उष्णतेचा त्रास नसायला पाहिजे. जी व्यक्ती नियमितपणे व्यायाम करते त्याच बरोबर व्यवस्थित पाणी पितात. त्या व्यक्तीने दररोज किंवा एका टायमिंगला मूठभर सुकामेवा खाल्ला तरी चालतो.

सुकामेवा खाण्याच्या वेळी आपण वरी सांगितल्याप्रमाणे घेतला तर आपल्या शरीराला योग्य त्या प्रमाणात ऊर्जाही मिळेल तसेच आपण तंदुरुस्त राहू. यामुळे आपण हिवाळ्यात ड्रायफ्रूट्स घेताना या 4 गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.Dry fruits

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *