Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Lampi Virus

Lampi Virus:आपण पाहत आहोत की यावर्षी जिल्ह्यातील शेतकरी हा वेगवेगळ्या संकटातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर यावर्षी खूप प्रकारचे संकट आले आहेत. ते म्हणजेच पावसाची उघडझाप नंतर या रोगाचा जनावरांवर होणारा प्रादुर्भाव आणि चांगले आलेल्या पिकांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव अशा संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपाचे नुकसान झाले. आज आपण या लेखात पाहणार आहोत की लंपी या आजारामुळे आपल्या जिल्ह्यात किती जनावर बाधित आहेत व किती जनावरांचा मृत्यू झाला आहे.

लंपी हा आजार जिल्ह्यात सर्व ठिकाणी पसरत आहे. आपण पाहत आहोत की या लंपी रोगामुळे आतापर्यंत जिल्ह्यांमध्ये 84 जनावरांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. आपण जर पाहिले तर लंपी या रोगाची सुरुवात नेमकं कोणत्या जिल्ह्यातून झाली व या रोगामुळे किती जनावर बाधित झाली हे आपण पाहणार आहोत. पाहिले तर दोन महिन्या अगोदर लंपी या आजाराची सुरुवात ही अंबाजोगाई तालुक्यातून झाली.Lampi Virus

गाय , बैल आणि वासरू या जनावरांमध्ये लंबी हा आजार पसरत आहे. लंबी या आजाराची लागवड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये झाली आहे. आपण पाहतो की लंपी हा आजार आतापर्यंत 184 गावांमध्ये पसरला आहे त्याचबरोबर या 184 गावांमध्ये 2381 जनावरांना लांबी या त्वचेच्या संसर्गजन्य साथीचा आजार झाला आहे.

उपचार केल्यानंतर 1335 जनावरे बरी झाली असून तरीसुद्धा सध्याच्या स्थितीत ११६३ जनावरे बाधित आहेत त्यातीलच 68 जनावरे हे गंभीर आजारी आहेत. प्रशासनाने हा आजार रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच जनावरांचे बाजार बंद , लसीकरण , वाहतूक बंद अशा उपायोजना राबवण्याचा निर्णय हाती घेतला. जिल्ह्यामध्ये जर पाहिले तर जनावरांचे लसीकरण हे 4 लाख 96 हजाराहून अधिक जनावरांना लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. हे लसीकरण जिल्हा परिषद च्या पशुसंवर्धन विभागासह व जिल्हा परिषद च्या मदतीने करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाकडे अजून 7 हजाराहून अधिक लसणाच्या मात्रा शिल्लक आहेत.Lampi Virus

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *