Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Loan waiver for all farmers

Loan waiver for all farmers: नमस्कार शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची मदत म्हणून 1,851 कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे. सभागृहात विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रस्ताव मांडले होते. त्याचबरोबर विरोधकांच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे मनाने की आम्ही 2 हेक्टर धानासाठी 15 हजारांऐवजी 20 हजार रुपये आर्थिक मदत शेतकऱ्यांना देणार आहोत.

पहा मुख्यमंत्री काय म्हणाले

शेतकऱ्यांची वाढत्या प्रमाणात होणारे आत्महत्या थांबवण्यासाठी कृती दलाची पुनर्रचना करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना पोर्टल सुरू केले असून याद्वारे आता शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपयांची कर्ज माफ केली जाणार आहे. अशी महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितली आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांच्या सरकारने केवळ एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला असून पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 177 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर मित्रांनो एक रुपयात पिक विमा योजनेत तब्बल एक कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी सरकारकडून 5174 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.Loan waiver for all farmers

महाराष्ट्रातील शेतकरी कर्ज माफ होणार

सध्या 2 हजार 121 कोटी रुपयांची रक्कम विमा कंपन्यांनी आगाऊ रक्कम म्हणून मंजूर केली आहे. 1217 कोटी रुपयांचे आगाऊ वाटप करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या भाषणादरम्यान त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. आम्ही धरणावर जाऊन पाहणी करतो. आम्ही घरी बसून फेसबुक लाईव्ह करत नाही. असा टोला त्यांनी लगावला.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक पंचनामा तयार करण्यात आला आहे. 32 जिल्ह्यांपैकी 26 जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांचे पंचनामे अद्याप प्रलंबित आहेत.

आतापर्यंत 9 लाख 75 हजार 59 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यासाठी सुमारे 2 हजार कोटींची मदत दिली जाणार आहे. पंचनामा होताच डीबीटीद्वारे मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

विरोधकांचा आरोप

मुख्यमंत्री शिंदे जुन्या घोषणा आणि आकड्यांचा खेळ खेळून शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून पळ काढत आहेत. शेतकऱ्यांना आगाऊच्या नावाखाली पीक विमा दिला गेला नाही. आता शेतकऱ्यांना 1553 रुपये अॅडव्हान्स देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांना ही रक्कम फार मोठी वाटत असेल तर सरकार, मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशील आहे? यावरून हे स्पष्ट होत असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

 

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे पोर्टल सुरू करून 6500 कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.Loan waiver for all farmersv

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *