Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Nuksan Bharpai 2022

Nuksan Bharpai 2022: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या बातमीमध्ये शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. ही बातमी वाचून तुम्हालाही नक्कीच फायदा होईल. आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक दिवसांपासून विविध भागात यावर्षी अतिवृष्टीने खूपच नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे बाहेरच पाडला म्हणजेच शेतकऱ्याचे शेती पीक हे अगदी शेवटच्या टप्प्यात आले होते. मात्र परतीच्या पावसामुळे हजारो हेक्टर मध्ये अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान झाले. या नुकसानीपोटी शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे देखील केले आहेत. परंतु, पंचनामे करून आता जवळपास खूपच दिवस झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात आता नुकसान भरपाई किती वाणी कधी मिळेल असा प्रश्न पडला आहे.

शेतकरी बांधवांनो दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई किती आणि कधी मिळेल हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खूपच चिंता वाटू लागली आहे. या चिंता बरोबरच दुसरी एक चिंता म्हणजेच अतिवृष्टी दोन काही प्रमाणात वाचलेली पिके वन्यप्राणी दररोज त्या उरलेल्या पिकाचे नुकसान करत आहेत. या वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.Nuksan Bharpai 2022

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी खरीप हंगामातील पिके ही पूर्णपणे वाया गेली आहेत. सुरुवातीला पाऊस कमी असल्यामुळे शेतकऱ्याने लावलेली पिक चुकून चालली होती. परंतु तरीदेखील काही पिके चांगल्या प्रमाणात आली होती. ती राहिलेली पिके शेवटच्या टप्प्यात आली होती. त्याच वेळी जास्त प्रमाणात पाऊस पडला या पावसामुळे काळदरी या परिसरात शेताच्या ताली, माती, रस्ते सर्वच होऊन गेली.

इतर अनेक ठिकाणी देखील कायम पाऊस चालू असल्यामुळे उभी पिके पाण्याने अक्षरशः सडून गेली. यादरम्यान जवळपास पंधरा दिवस शेतकऱ्यांना शेतात जाणे देखील अवघड झाले होते. या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी, घेवडा, कांदा, मुग, भुईमूग, मका अशी इत्यादी पिके वाहून गेली व त्याचबरोबर काही पिके जागीच सडून गेली. आणि विशेषतः या अवकाळी पावसामुळे राज्यातील फळपीक देखील संकटात सापडले होते. यामुळे फळपिकांचे देखील खूप सारे नुकसान झाले. आता सर्व शेतीचे पंचनामे झाले आहेत. परंतु नुकसान भरपाई किती मिळणार? आणि कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात देखील शेती विकासाचे होता हे नुकसान?

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

अवकाळी पावसाचा वाचलेली पिके शेतकरी चांगली जपत आहेत. मात्र शेतकरी दिवसा शेतात काम करून रात्रीच्या वेळी घरी आल्यानंतर शेताकडे असलेले वन्य प्राणी शेतात घुसून उभ्या पिकाचे खूप नुकसान करत आहेत. या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जवळपास घेवडा, भुईमूग, मका, बाजरी अशा इत्यादी पिकांचे खूप नुकसान झाले आहे.

आता या वन्यप्राण्यांपासून शेती कशी सुरक्षा ठेवावे? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहेत.Nuksan Bharpai 2022

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *