Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
PM Kisan Yojana

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत बँक खात्यात दिली जाते.

पात्र लाभार्थ्याला प्रति वर्ष 6000 रुपये निधी मिळविण्यासाठी नोंदणी करावी लागेल, जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करावी लागेल.

तुम्ही PM किसान नोंदणी ऑनलाईन करू शकता. नोंदणी पद्धत अतिशय सोपी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करावी लागेल जी मुख्य 6 पायऱ्याच्या मदतीने करावी. चला या 6 पायऱ्या पाहू आणि ऑनलाइन नोंदणी कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ.

 

पी एम किसान योजनेची नाव नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

 

पीएम किसानने नवीन नोंदणी अशा प्रकारे करावी

पीएम किसान नवीन नोंदणीसाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या मोबाइल ब्राउझरमधील अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.PM Kisan Yojana

तुम्हाला ही ऑनलाइन नोंदणी वर नमूद केलेल्या अधिकृत वेबसाइटवर करावी लागेल. आपण या ठिकाणी नोंदणीसाठी सहा महत्त्वाच्या पायऱ्या पाहणार आहोत.

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला येथे अनेक पर्याय दिसतील, सर्वप्रथम तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणीच्या पर्यायाला स्पर्श करावा लागेल.

आता या ठिकाणी तुमच्या समोर पुन्हा एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक आणि तुमचे राज्य निवडावे लागेल ज्याखाली तुम्हाला कॅप्चा भरावा लागेल आणि गेट OTP या बटणावर टच करावे लागेल.

या बॉक्समध्ये तुम्ही दिलेल्या मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.

प्राप्त झालेला OTP येथे एंटर करा आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा नोंदणीसाठी Proceed बटण दिसेल, त्याला स्पर्श करा.

तुम्हाला येथे विचारलेली माहिती किंवा प्रश्न अचूक भरावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्या.

आता येथे तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल.

ही सर्व माहिती अचूक भरल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर नोंदणी पूर्ण झाल्याचा संदेश दिसेल.

अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन माध्यमातून पीएम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी करू शकता.

नोंदणीकृत पात्र शेतकरी आता वर्षाला 6,000 रुपये मिळण्यास पात्र असतील.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *