Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
ration card online

ration card online आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये राशन घेण्यासाठी महिला येत असतात. तसेच त्याच महिला शेतात घर कामे करत असतात तर शेतातील कामे करत असताना त्यांच्या बोटावर असणाऱ्या रेषा आहेत त्या अंधुक होतात. ते बोट किंवा अंगठा त्या मशीनवर स्कॅन होत नाही. त्यामुळे राशन घेण्यासाठी खूप अडचणी येत होत्या तर आता त्या अडचणी येणार नाहीत.

राशन दुकानांमध्ये अंगठा स्कॅन न होणे ही एक प्रकारची समस्या निर्माण झालेली होती. राशन धारकाचा अंगठा जर लवकर स्कॅन झाला नाही तर राशन दुकानासमोर महिलांच्या रांगाची रांगा लागत असायच्या. आता या समस्या वरती उपाय आलेला आहे. जरी राशन धारकाचे बोट किंवा अंगठा स्कॅन नाही झाले तरी सुद्धा लवकरात लवकर त्या राशन धारकांना राशन देण्यात येणार आहे.

ration card online ग्रामीण भागातील महिला या शेतामध्ये काम करत असतात. शेतातील काम केल्यामुळे महिलांच्या बोटांवरती रेषा अंधुक व्हायच्या त्याचबरोबर रेशन दुकानांमध्ये जे स्कॅन करण्यासाठीची मशीन आहे ती देखील 2 G E pos machine आहे.त्यामुळे देखील अंगठा लवकर स्कॅन होत नव्हता कारण तिथे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी ही कमी पडत होती.

इंटरनेटचा प्रॉब्लेम मुळे राशनधारकांसाठी निर्माण होत होत्या अडचणी

बोट किंवा अंगठा स्कॅन होत नव्हता त्यामुळे राशनधारकांना खूप टेन्शन यायचे परंतु आता या टेन्शन पासून नागरिकांची सुटका होणार आहे. सुरुवातीला राशन दुकानांमध्ये 2G E pos machine वापरली जात होती तर आता त्या ऐवजी राशन दुकानांमध्ये 4G E pos machin त्याचबरोबर सोबत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर ही राशनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे. ही सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे राशनधारकांचे टेन्शन कमी होईल. 2 G इंटरनेटमुळे बोट किंवा अंगठा स्कॅन होण्याची प्रोसेस ही खूप हळू चालायची त्यामुळे नागरिकांना राशन घेण्यासाठी वेळ लागायचा तर आता 2 G ऐवजी 4G इंटरनेटमुळे ही प्रोसेस लवकरच होऊन नागरिकांना लवकरात लवकर राशन मिळेल.

अंगठा जरी स्कॅन नाही झाला तरी देखील राशन धारकांना मिळेल राशन

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

ग्रामीण भागातील पुरुष व महिला या शेतात काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या बोटांवरील रेषा ह्या अंधुक होतात तर त्यांचा अंगठा किंवा बोट स्कॅन होण्यास वेळ लागतो. कधी कधी स्कॅन देखील होत नाही त्यामुळे राशन धारकांना खूप टेन्शन येते. कधी कधी राशन धारकांना धान्य न घेता देखील घरी जावे लागत होते परंतु आता या सर्व समस्या पासून राशन धारकांना सुटका मिळत आहे.

राशन दुकानांमध्ये राशन धारकांचा अंगठा स्कॅन जरी नाही झाला तरी जी नवीन इरीस मशीन आली आहे. त्या मशीनने राशन धारकांचे डोळ्याचे स्कॅन करून त्यांना राशन देण्यात येणार आहे. ही नवीन पद्धत आल्यामुळे राशनधारकांना चिंता करण्याची गरज नाही.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *