batata chips recipe नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये अशा जंक फूड बद्दल माहिती पाहणार आहोत की तो सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. जंक फूड म्हणलं की लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. परंतु ते खाणे आपल्या शरीरासाठी योग्य आहे का नाही याचा विचार आपण करत नाहीत. ते जंक फूड म्हणजेच चिप्स. चिप्सला जंक फूड म्हणून देखील ओळखले जाते त्याचबरोबर चिप्स आपण घरी सुद्धा बनवू शकतो हे आपल्याला माहीत असेल परंतु कसे बनवायचे हे आज या लेखांमध्ये सांगितले जाणार आहे. जर आपल्याला सुद्धा घरच्या घरी चिप्स बनवायचे असतील तर आपण हा लेख शेवटपर्यंत वाचावा. त्याचबरोबर बाहेरचे चिप्स खाणे चांगले की घरचे हे सुद्धा आपल्याला माहीत नसते. आपल्याला असे वाटते की चिप्स चिप्स आहे घरचे काय आणि बाहेरचे काय. परंतु तसे नसते घरचे चिप्स हे बाहेरच्या चिप्सपेक्षा खूप छान असते. त्याचबरोबर घरचे चिप्स हे आरोग्यासाठी बाहेरच्या चिप्सपेक्षा चांगले असतात.
चिप्स हा सर्वांना आवडता पदार्थ आहे
चिप्स हे लहान मुले देखील जास्त आवडीने खातात. त्याचबरोबर मोठ्यांना देखील चिप्सची आवड असते. चिप्स हा एक असा पदार्थ आहे जो की उपवास असल्यानंतर फराळ करायला सुद्धा वापरला जातो. आपल्या सर्वांना माहीतच आहे चिप्स हे बटाट्यापासून बनलेली असतात. परंतु ते बनवायचे कसे याचा विचार आपण कधी केला आहे का? काही जणांनी चिप्स बनवलेले असतील परंतु काहींना चिप्स बनवता येत नसतील. घरी चिप्स बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे आपण थोडा वेळ काढून घरीच चिप्स बनवावे म्हणजे ते आपल्यासाठी त्याचबरोबर लहान मुलांसाठी सुद्धा चांगले राहते. चिप्स हे चवीला चविष्ट असतात म्हणून लहान मुले सुद्धा जास्त प्रमाणात खात असतात.
या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर व्यक्ती हे घरी चिप्स न बनवता लहान मुलांना पॅकेटचे चिप्स खायला देत असतात. कारण घरी चिप्स बनवायला जास्त वेळ त्यांच्याकडे नसतो. किंवा ते कसे बनवायचे हे त्यांना माहीत नसते त्यामुळे ते मुलांना पॅकेटचे चिप्स देतात. पॅकेटच्या चिप्सचे चव हे छान असते परंतु ते आरोग्यासाठी चांगलं नसते. लहान मुलांना जर आपण पॅकेटचे चिप्स दिले तर मुले ते काही वेळातच खाऊन टाकतात. त्याचबरोबर काही मुले एका दिवसामध्ये अनेक चिप्सचे पॅकेट संपवत असतात. परंतु हे पॅकेटचे चिप्स खाणे लहान मुलांसाठी योग्य नाही त्याचबरोबर ते मोठ्यांसाठी सुद्धा योग्य नाही. कारण पॅकेजचे चिप्स मध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते त्याचबरोबर त्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह वापरले जाते. प्रिझर्वेटिव्ह म्हणजेच कि ते चिप्स खूप काळापर्यंत त्या पुड्यामध्ये चांगले राहावे यासाठी वापरले जाणारे पदार्थ. ते वापरलेले पदार्थ आपल्या शरीरासाठी चांगले नसतात. त्यामुळे पॅकेटचे चिप्स खाणे आपल्या आरोग्यासाठी तसेच शरीरासाठी चांगले नाही. तसेच पॅकेटच्या चिप्स मध्ये कॅलरीचे प्रमाण सुद्धा जास्त बघायला मिळते. पॅकेटच्या चिप्स मध्ये जास्त असणाऱ्या कॅलरीज, तेलाचे प्रमाण जास्त त्याचबरोबर वापरले जाणारे प्रिझर्वेटिव्ह यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह सारखा आजार बघायला मिळतो. त्यामुळे पॅकेट मधील चिप्स खाणे टाळावे.
batata chips recipe पॅकेट मधील चिप्स पेक्षा आपण घरी बनवलेले चिप्स आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. तसेच आपण घरी जे चिप्स बनवत असतो ते चिप्स आपण आपल्या इच्छेनुसार किती तेल वापरायचे त्याचबरोबर किती आकार मोठा छोटा करायचा हे आपण ठरू शकतो. तसेच घरी बनवलेले चिप्स सुद्धा खूप दिवस टिकतात. घरी बनवलेले चिप्स खूप दिवस टिकून राहण्यासाठी त्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरले जात नाही. आपण पाहतो की चिप्सची आवड ही प्रत्येकाला आहे म्हणून कोणीही चिप्स खाताना विचार करत नाही तिथे चांगले आहे की वाईट आहे. त्याचबरोबर जर आपल्याला उपवास असेल आणि भूक लागली तरी सुद्धा आपण या पॅकेटच्या चिप्सचा वापर करतो. परंतु हा पॅकेटचा वापर जास्तीचा करणे टाळावे किंवा पॅकेजच्या चिप्स चा वापर करूच नये. तुम्ही म्हणताल पॅकेजची चिप्स खायचे नाही आम्हाला घरी बनवता येत नाही तर मग करायचे काय. घरी बनवायचे असतील तर आपण या लेखांमध्ये चिप्स बनवण्याची माहिती देणार आहोत ती वाचून आपण नक्कीच घरी चिप्स बनवू शकतात. घरी चिप्स बनवण्यासाठी साहित्य सुद्धा जास्त लागत नाही. कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. कोणतीही रेसिपी बनवण्यासाठी आपण मनात आवड निर्माण केली की कोणतीही रेसिपी आपोआपच सोपी वाटायला लागते त्याचबरोबर लवकर बनवून तयार देखील होते. चला तर मग जाणून घेऊ घरी चिप्स कसे बनवायचे.
बटाट्याचे चिप्स बनवण्याचे घरगुती त्याचबरोबर सोपी पद्धत जाणून घेऊया
आपण आपल्या घरी जर चिप्स बनवायचे ठरवले तर सर्वप्रथम आपण आपल्याला चिप्स किती बनवायचे आहे याचा अंदाज लावावा. कारण किती चिप्स बनवायचे आहेत यावरून आपल्याला किती बटाटे लागतील हे ठरवता येईल. त्याचे माप आपण आपल्याला जेवढे चिप्स करायचे आहेत त्या अंदाजाने घ्यावे.
नंतर घेतलेले बटाटे हे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. चिप्स बनवायचे म्हणल्यानंतर बटाटे तर धुऊन घ्यावे लागतील.
धुतलेले बटाटे आता छलून घ्यायचे आहेत. सलून म्हणजेच बटाट्याच्या वरी असणारी जी साल आहे ती साल चाकूच्या किंवा मदतीने काढून घ्यावी. बटाट्याचे चिप्स बनवायचे म्हणल्यानंतर वरची साल काढायलाच लागते.
साल काढल्यानंतर बटाटे पाण्यामध्येच ठेवावे त्याचबरोबर आपण स्लायसरच्या मदतीने किंवा चिप्स बनवण्याच्या खीसणीने आपण चिप्स बनवून घेऊ शकतो. परंतु चिप्स बनवत असताना बनवलेले चिप्स आणि छलून घेतलेले बटाटे पाण्यामध्येच ठेवावे. ते बटाटे किंवा चिप्स आपण पाण्यामध्ये ठेवले नाही तर ते लाल किंवा काळी पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आपण चिप्स बनवत असताना आठवणीने ते बटाटे किंवा चिप्स पाण्यामध्ये ठेवावे.
सर्व बटाट्याचे चिप्स करेपर्यंत आपण एका गॅसवर पाणी गरम करायला ठेवावे. ते पाणी गरम झाल्यानंतर, पाणी उकळल्यानंतर किंवा त्यातून वाफ निघायला चालू झाली की आपण त्यामध्ये तयार केलेले बटाट्याचे चिप्स त्या पाण्यामध्ये टाकून घ्यावे.
आपल्याला जर चिप्स हे सॉल्ट म्हणजेच (खारट) चिप्स करताना थोडे मीठ वापरायचे असेल तर त्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण थोडेसे सैंधव मीठ टाकून घेतले पाहिजे. सेंधव मीठ हे अगोदर पाण्यात टाकावे आणि नंतर तयार केलेले चिप्स.
त्या उकळलेल्या पाण्यात चिप्स आणि सैंधव मीठ टाकून घेतल्यानंतर त्यावर थोडे झाकण ठेवावे.
तयार केलेले चिप्स गरम पाण्यात टाकल्यानंतर ते पूर्णपणे शिजू द्यायचे नाही थोडे हलक्या प्रमाणात शिजवावे.
चिप्स हलक्या प्रमाणात शिजवून झाल्यानंतर कडक उन्हामध्ये एक कापड हाथरून त्यावरती ते सर्व चिप्स एक एक करून वाळत घालावे.
ते कडक उन्हामध्ये पसरवलेले चिप्स तीन चार तास तसेच ठेवावे. त्यानंतर ते दोन्ही बाजूने वाळले की नाही त्याची खात्री करून घ्यावी.
जर ते चिप्स दोन्ही बाजूने वाळले नसतील तर त्यांना अलटून पलटून टाकावे. अलटून पलटून म्हणजेच ज्या बाजूने वाळले नाहीत ती बाजूवरी करावी म्हणजे आपले चिप्स दोन्ही बाजूने वाळतील
आपण बनवलेले बटाट्याची चिप्स जर दोन्ही बाजूने चांगले वाळले असतील तर ते आपण काही दिवसांसाठी साठवून ठेवू शकतात.
साठवून ठेवण्या अगोदर आपण केलेल्या चिप्स कसे झाले आहे हे पाहण्यासाठी काही चिप्स आपण तळून खावे.
एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे. त्यामध्ये बनवून घेतलेले बटाट्याचे चिप्स टाकून गॅस हा कमी ठेवून तळून घ्यायचे. त्या चिप्सचा थोडा सोनेरी कलर झाल्यानंतर त्या गॅसची फ्लेम वाढवायची म्हणजे आपले चिप्स कुरकुरीत बनतील.
नंतर हे सोनेरी झालेले चिप्स किंवा तळलेले चिप्स एका चाळणी मध्ये काढून ठेवायचे म्हणजे त्यातील तेल खाली निसरेल आणि आपली चिप्स हे तेलकट होणार नाहीत त्याचबरोबर ते खायला देखील कुरकुरीत होतील.
ही होती घरगुती चिप्स बनवण्याची रेसिपी. चिप्स बनवत असताना आपण एक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजेच चिप्स हे घरात किंवा पंख्याखाली वाळत ठेवू नये. कारण पंख्याखाली वाळलेले चिप्स हे काळे किंवा लाल पडण्याची शक्यता असते. त्यामुळे चिप्स कधीही पंख्याखाली वाळत ठेवू नका.
हे बनवलेले चिप्स आपण आपल्या घरी वर्षभरासाठी ठेवू शकतो.त्याचबरोबर जेव्हा आपली इच्छा होईल त्यावेळेला हे तळून खाऊ शकतो. ज्यावेळी आपल्याला उपवास असेल त्यावेळी देखील आपण हे चिप्स तळून उपवासासाठी फराळ म्हणून खाऊ शकतो.batata chips recipe