chiku lagwad mahiti चिकू लागवड कशी करतात आणि आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत चिकू मध्ये

chiku lagwad mahiti नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये एका फळाबद्दल माहिती पाहणार आहोत त्या फळाचे नाव आहे चिकू. चिकू या फळाची लागवड कशा प्रकारे केली जाते, या फळाचे आपल्या आरोग्यासाठी कोणकोणते फायदे आहेत तसेच चिकू बद्दल सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. आपल्याला सुद्धा चिकू बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख संपूर्ण वाचावा.

आपण पाहतो सध्या बाजारामध्ये चिकू या फळाची मागणी दिवसेंदिवस जास्तच वाढताना बघायला मिळते. त्यामुळे बरेच शेतकरी तसेच बऱ्याच घरी चिकू या फळाची लागवड करण्यात येते. चिकू हे झाड आपण घरी अंगणात त्याचबरोबर शेतात देखील लावू शकतो. चिकूचे झाड हे आपण कधीही लावू शकतो म्हणूनच या चिकूच्या झाडाला बारमाही फळझाड असे देखील म्हणले जाते. चिकू चे सेवन करून आपण आपल्या शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्वे ते म्हणजे अ, ब, आणि क मिळतात. चिकूचे झाड हे मोठे असते परंतु त्याचे खोड बारीक असते. त्याचबरोबर चिकू हे फळ तांबूस रंगाचे असते. या फळाचे आपल्या आरोग्यासाठी भरपूर वेगवेगळे फायदे आहेत त्याबद्दल देखील आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच चिकू हे फळ आपण कोणत्या वेळेला खायला पाहिजे किंवा कोणत्या वेळेला खाल्लेले आपल्या आरोग्यासाठी चांगले राहते याबद्दल देखील माहिती जाणून घेऊ.

चिकू हे फळ लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या आवडीचे बनलेले आहे त्यामुळे या फळाला बाजारामध्ये जास्त मागणी आहे. सुरुवातीला आठ ते दहा महिन्याच्या बाळाला देखील चिकू खायला देतात. आणि हे चिकू खाण्यामागील आपल्या आरोग्याला भरपूर असे फायदे आहेत. जर आपण आपल्या घरी चिकूचे एखादे दोन झाडे लावले तरीसुद्धा आपल्याला त्या झाडांची चिकू खायला मिळतील. घरच्या अंगणात देखील चिकूचे झाड चांगले येत असते.

आपल्या आरोग्यासाठी चिकू खाण्याचे फायदे

चिकू खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत ते आपण जाणून घेऊ. चिकूचे सेवन केल्याने आपली त्वचा निरोगी राहते त्याचबरोबर आपली जी रोगप्रतिकार क्षमता असते तिचे कार्य देखील व्यवस्थित असते. त्याचबरोबर चांगले पचन होण्यासाठी देखील हे फळ मोठ्या प्रमाणामध्ये मदत करते. चिकू या फळाचे आपल्या शरीरातील हृदयासाठी देखील खूप मोठा फायदा आहे.

चिकू या पिकाची लागवड कशी केली जाते त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया

चिकू हे फळ जर आपल्याला घरी अंगणात लावायचे असेल तर त्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. परंतु चिकूचा बाग जर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागते म्हणजेच जमीन कशी आहे कशी जमीन लागते त्याचबरोबर पाणी किती आहे, आपल्याला किती पाणी लागेल तसेच या जमिनीचे वातावरण कसे आहे, कोणते खत वापरावे याबद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेचे असते आणि हीच महत्त्वाची माहिती आज या लेखामध्ये दिली जाणार आहे तरी आपण हा लेख संपूर्ण वाचावा.

चिकूची लागवड करण्यासाठी जमीन ही उत्तम निचरा होणारी त्याचबरोबर त्या ठिकाणी सतत पाण्याची सोय असणारी अशी चांगली जमीन लागते. जर आपली जमीन ही भारी असेल तर त्या जमिनीमध्ये आपल्याला चर खोदावे लागतात आणि ते चर खोदून त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होणे गरजेचे असते. कारण चिकू या फळाची वाढ होण्यासाठी दमट व कोरडे वातावरण असणे गरजेचे असते. या फळाची वाढ त्याचबरोबर या या पिकाचे उत्पन्न चांगले येण्यासाठी हवामान हे कोरडे व दमट असणे गरजेचे आहे. जर जमीन ही चांगला पाण्याचा निचरा होणारी त्याचबरोबर वातावरण हे दमट व कोरडे असेल तर आपण या पिकामध्ये जसे पाहिजे तसे उत्पन्न मिळू शकतो.

जर चिकू या पिकाची लागवड करण्यासाठी कलम केलेले रोपवाटिका आणायचे असेल तर त्यासाठी आपण दहा बाय दहा मीटर अंतरावर एक बाय एक मीटर आकाराचे खड्डे खांदून घ्यावे. त्या खड्ड्यांमध्ये वाळवी लागू नये म्हणून मिथिल पॅराथिऑन टाकावा. केव्हा कार्बारिल 5 टक्के भुकटी मिसळून घ्यावी.

खांदलेले खड्डे चांगली माती त्याचबरोबर त्यामध्ये चार टोपले शेणखत आणि अडीच किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण करून त्या मिश्रणाने भरून घ्यावेत. पीक लागवड करण्यासाठी जे रोपवाटिका सरकार मान्य आहेत त्या रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठांमध्ये जी कलमे केलेली असतात ती कलमे खरेदी करून आणावीत.

चिकू या पिकाची लागवड करायची असेल आणि त्यातून उत्पादन हे चांगले मिळवायचे असतील तर आपण जाणून घेऊ कोणत्या जाती ह्या चांगल्या उत्पन्न देत आहेत. चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी आपण कालीपत्ती , क्रिकेट बॉल या जातीची लागवड करणे गरजेचे आहे. जर आपण या जातीची लागवड केली तर त्यामधून आपल्याला चांगले उत्पादन मिळू शकते कारण या जाती ह्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या आहेत.

चिकू या पिकाची लागवड जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये करावी. आपण कलम केलेले रोपवाटिका लावलेले आहेत त्यांना नंतर काठीचा आधार द्यावा. चिकू या पिकाची लागवड केल्यानंतर सुरुवातीचे जे दोन वर्षे आहेत त्या दोन वर्षांमध्ये खुंटावरील आहे वारंवार जी फूट येते ती फूट काढून टाकावी. कलम केलेले चिकूचे रोप लावले तरीसुद्धा त्याला येण्यासाठी आठ वर्ष लागत असतात. म्हणजेच कलमाची वाढ होण्यासाठी पूर्ण आठ वर्षाचा कालावधी लागतो. चिकू या पिकांमध्ये आपण सुरुवातीचे सहा वर्षांमध्ये आंतरपीक घेऊ शकतो. चिकूच्या भागांमध्ये आपण फुलझाडे, कडधान्य आणि भाजीपाला असे पीक घेऊ शकतो. चिकूच्या पिकामध्ये जर आपण आंतरपीक घेतले तर त्यातून आपल्याला चांगला नफा मिळू शकतो.

chiku lagwad mahiti चिकू या पिकाची लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी त्या प्रत्येक एका कलमाला 300 ग्रॅम युरिया, एक टोपले शेणखत 300 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आणि 900 ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट दोन हत्यांमध्ये समान प्रमाणामध्ये द्यावे. तर सुरुवातीचा पहिला हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्ये करावा. जानेवारी महिन्यात दुसरा हप्ता करून घ्यावा म्हणजेच दुसऱ्या हप्त्यातील ही खते जानेवारी महिन्यामध्ये टाकून द्यावीत. या पिकाच्या लागवडीनंतर दुसऱ्या वर्षी देखील या पिकाला खत द्यावे लागते तर ते खत पहिल्या वर्षीच्या दुप्पट दुसऱ्या वर्षी द्यावे. चिकूच्या रोपांना आपण आळे पद्धतीने जर पाणी देत असलं तर ते आळी झाडाच्या विस्ताराच्या आकाराचे गोल करावे. झाडाला नेहमी पाणी द्यावे लागते परंतु पाणी देत असताना एक काळजी नेहमी घ्यायला हवी ती म्हणजेच की त्या आळ्यामध्ये पाणी साचून राहणार नाही. आपण चिकूच्या रोपांना आळे करून देखील पाणी देऊ शकतो त्याचबरोबर त्याला ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन चा वापर करू शकतो. पाणी कसेही द्या परंतु नेहमीच पाणी द्यावे लागते. आणि साचून राहणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

जर आपण या पद्धतीने चिकू या पिकाची लागवड केली तसेच सांगितल्याप्रमाणे खत पाणी याची काळजी घेतली तर आपण चांगले उत्पन्न मिळू शकतो. त्याचबरोबर पहिला सहा वर्षांमध्ये त्यामध्ये आंतरपीक घेऊन आपण अजून जास्तीचा नफा मिळवता येतो. हि होती चिकू या पिकाची लागवड कशी करावी त्याचबरोबर त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दलची संपूर्ण माहिती. त्याच पद्धतीने आपण चिकू या पिकाच्या लागवडीमध्ये कोण कोणते अंतर पीक घेता येते हे देखील या लेखांमध्ये वरी सांगण्यात आलेले आहे त्यामुळे हा लेख कुठेही वाचता वाचता सोडू नये. चला तर मग तसेच जाणून घेऊ चिकू या झाडाचा औषधी उपयोग काय म्हणून किंवा कशासाठी होतो.

चिकू या झाडाचे कोणकोणते औषधी उपयोग आहेत ते जाणून घेऊ

आपल्या सर्वांना माहित आहे कोणतेही फळ खाल्ले तरीसुद्धा आपल्यामध्ये थोडीशी शक्ती आल्यासारखे वाटते तसेच चिकू हे फळ खाल्ल्याने देखील आपल्यामध्ये थोडी शक्ती येते. ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास आहे त्यांचा पित्ताचा त्रास देखील कमी होतो. एखाद्या व्यक्तीला बुद्धकोष्ठतेची समस्या असते, त्या व्यक्तीने देखील चिकूचे नियमित सेवन करावे. कारण चिकूचे नियमित सेवन केल्याने ही समस्या दूर होते. चिकू हे फळ बऱ्याच आजारांवरती उपयोगाला येते. चिकू या फळाचे सेवन करून डोकेदुखी, ताप आणि लघवीला होत असलेला त्रास त्याच बरोबर पित्त कमी होते. हे होते चिकूया फळाचे आपल्या आरोग्यासाठी औषधी उपयोग.chiku lagwad mahiti

Leave a Comment