Tur Pik Lagavd Mahiti: तुर पिकाची लागवड करण्याची सर्वात सोपी पद्धत, या पद्धतीने तुरीची लागवड केल्याने मिळेल जास्त उत्पन्न

Tur Pik Lagavd Mahiti: नमस्कार मित्रांनो, अनेक जण खरीप हंगामात कोणत्या पिकाची लागवड करावी असा विचार करत असतात. त्याचबरोबर अनेक जण युट्युब वर व्हिडिओ पाहतात. आणि अनेक भागात पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे कोणत्या पिकाची लागवड करावी. असा देखील अनेकांचा संभ्रम असतो. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात असतो आणि ज्या व्यक्तींकडे ठिबक सिंचन किंवा कोणत्याही पद्धतीचा पाणीसाठा नाही त्यांच्यासाठी तर कोणत्या पिकाची लागवड करावी हा खूपच मोठा निर्णय असतो.

त्याचबरोबर मित्रांनो आता सर्वच नागरिकांना ठिबकची सोय व्हावी यासाठी सरकारकडून ठिबक सिंचन अनुदान देखील जात आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्याकडे स्वतःची विहीर नाही किंवा बोर नाही त्यांना बोरवेल खोदण्यासाठी त्याचबरोबर विहीर खोदण्यासाठी सरकारकडून अनुदान देखील मिळत आहे.Tur Pik Lagavd Mahiti

 

त्याचबरोबर हे अनुदान घेऊन शेतकरी त्यांच्या शेतात विहीर किंवा बोर देखील घेत आहेत. आणि त्याचबरोबर काही वर्षानंतर किंवा काही वेळानंतर शेतकरी लगेच आपल्या रानामध्ये ठिबक सिंचन देखील बसवून घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुमच्याकडे जर ठिबक सिंचन असेल तर तुम्ही तुर पिकाची लागवड करून चांगल्या प्रमाणात नफा कमवू शकता. आणि मित्रांनो तुमच्याकडे जर ठिबक सिंचन नसेल तरीही तुम्ही आम्ही सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही पिकाची लागवड केली तर चांगल्या प्रमाणात नफा कमवू शकता.

मित्रांनो महाराष्ट्रात खरीप हंगामात तुर पिक हे कडधान्य पिकांमध्ये प्रमुख पीक मानले जाते. आणि त्याचबरोबर या पिकाची लागवड देखील महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्याचबरोबर तज्ञांच्या मते तो पिकाची लागवड ही वेळेवर केली पाहिजे. त्याचबरोबर तूर पिकाची लागवड करण्याची योग्य वेळ कोणती आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहुयात…

शेतकरी मित्रांनो तुर पिक हे खूपच महत्त्वाचे पीक म्हणून ओळखले जाते. आणि या पिकाची लागवड तज्ञांच्या मते 30 जून पर्यंत होणे आवश्यक असते. आणि यानंतर जो शेतकरी तुर पिकाची लागवड करेल त्या शेतकऱ्याला उत्पन्नात नक्कीच घट होईल असे देखील तज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनो तुम्ही जास्तीत जास्त सात जुलै या तारखेपर्यंत तूर पिकाची लागवड करू शकता.

यानंतर तुम्ही जरूर पिकाची लागवड केली तर तुम्हाला जास्त प्रमाणात उत्पन्न होणार नाही त्याचबरोबर एखाद्या वेळेस तोटा देखील सहन करावा लागेल. शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुर या पिकातून जास्त प्रमाणात उत्पन्न घ्यायचे असेल तर तुम्ही 30 जून पूर्वी तुर पिकाची पेरणी करा..

तूर पिकाची पेरणी करण्यासाठी कोणत्या पद्धतीची जमीन असणे आवश्यक आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात…

तुर पिकाची लागवड करण्यासाठी मध्यम ते भारी क्वालिटीची जमीन असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा उत्तम प्रकारे होण्या आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आणि शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुभवानुसार चोपन क्षारयुक्त जमीन तूर या पिकाला मानवत नाही.

यामुळे तुमच्या शेतामध्ये शेवटच्या कुळवणीच्यावेळी हेक्टरी कमीत कमी 15 ते 20 गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून काडीकचरा वेचून जमीन पेरणीसाठी तयार करावी. आणि त्याचबरोबर ज्या वेळेस तुर पिकासाठी समाधानकारक पाऊस पडेल त्यावेळेसच तूर पिकाची पेरणी करावी. म्हणजेच कमी पावसावर तूर पिकाची पेरणी करू नये. यामुळे तुम्हाला दुबार पेरणी देखील करावे लागू शकते.

यामुळे तज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार तुम्ही आपल्या शेत जमिनीमध्ये कमीत कमी चार बोटं बोल असल्यावरच तूर पिकाची लागवड करा. त्याचबरोबर तूर पिकाची पेरणी करण्या अगोदर कुळवणी करणे आवश्यक आहे. यामुळे शेतामध्ये वापसा झाल्यानंतर लगेच कुळवणी करून घ्यावी. आणि त्यानंतर योग्य पाण्याची ओल असल्यावर तुरीची पेरणी लगेच करावी. त्याचबरोबर तुरीची पेरणी करणे अगोदर बियाण्यास बुरशीनाशकाची रायझोबियम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ही प्रक्रिया माहीत नसेल तर तुम्ही खरेदी केलेल्या तूर बियाण्यांपाशी या प्रक्रियेची माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही यापैकी ही प्रक्रिया youtube वर देखील सर्च करून पाहू शकता. आणि शक्य असेल तर तुमच्या गावातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याकडून देखील माहिती घेऊ शकता.

त्याचबरोबर तुर पिकाची पेरणी किती अंतरावर करावी याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात…

. तुर पिकाची पेरणी देखील खूपच अंतर सोडून करू नये किंवा खूपच जवळजवळ करू नये. यामुळे मित्रांनो तज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसारच तूर पिकाची पेरणी करावी. मित्रांनो तुम्ही तूर पिकाची बियाणे कोणत्या क्वालिटीचे अंदाज यावर तुर पिकाची पेरणी अवलंबून असते. चला तर मग याबद्दल आपण विस्तार पणे माहिती पाहूयात.

मित्रांनो तुम्ही जर तुर पिकाची लवकर काढणी होणाऱ्या जातीची निवड केली असेल तर तुम्ही या वाणाची पेरणी 45 बाय 10 सेमी अंतरावर करावी. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर मध्यम कालावधीमध्ये निघणाऱ्या तूर पिकाच्या जातीची पेरणी करण्याचा विचार करत असाल तर या वाहनांमधील अंतर हे 60 बाय 20 सेमी किंवा 90 बाय 20 सेमी असावे. त्याचबरोबर मित्रांनो अधिक माहिती तुम्ही कृषी सेवा केंद्रामध्ये घेऊ शकता.

शेतकरी मित्रांनो तुर पिकापासून अनेक शेतकरी वर्षानुवर्ष नफा कमवत आहेत. यामुळे तुर पिकाला देखील आता नगदी पीक म्हणून ओळखले जात आहे. त्याचबरोबर तूर पिकाला सध्या बाजार भाव देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे. आणि मित्रांनो तूर ही आपण डायरेक्ट बाजारामध्ये विकू शकतो किंवा आपण तुरीची डाळ बनवून देखील दुकानांमध्ये विकू शकतो यामुळे आपण दुहेरी नफा कमवू शकतो.

मित्रांनो तुम्हाला जर जास्तीत जास्त नफा कमवायचा असेल तर तुम्ही तुरीचे पाणी व्यवस्थापन देखील करणे आवश्यक आहे…

मित्रांनो तुरीचे पाणी व्यवस्थापन करणे खूपच सोपे आहे परंतु तुमच्याकडे ठिबक सिंचन असणे आवश्यक आहे. कारण मित्रांनो तुम्ही जर वाफे स्वरूपात तुरीला पाणी देत असाल तर तुम्हाला खुरपणीला जास्त खर्च होईल. कारण वापीस रूपात पाणी दिल्यानंतर शेतीमध्ये गवत मोठ्या प्रमाणात होते. आणि यामुळे तुम्हाला जास्त पैसे लागतील.

आणि त्याचबरोबर पाणीसाठा जर कमी प्रमाणात असेल तर सर्व तुरीला पाणी देखील पुरणार नाही. यामुळे तुम्ही ठिबक सिंचन नक्की करून घ्यावे. ठिबक सिंचन निपाणी सोडल्यामुळे डायरेक्ट तुरीच्या बुडाला पाणी पोहोचते. आणि यामुळे तुमच्या शेतात गवत देखील जास्त प्रमाणात होत नाही. आणि याच कारणामुळे तुमच्या शेतातील गवत खुरपण करण्यासाठी जास्त मजूर देखील लागत नाहीत आणि खुरपण करण्याचा खर्च तुमचा वाचतो.

त्याचबरोबर मित्रांनो पावसाने जर तूर पिकाची पेरणी केल्यानंतर तीस दिवसाचा अखंड घेतला तर तुम्ही तुर पिक उघड्यापासून पंधरा दिवसानंतर एक वेळेस पाणी देऊ शकता यामुळे तुमच्या तुरीला तेजी येईल. आणि त्याचबरोबर त्यानंतर तुम्ही थेट पाऊस न पडल्यास पंधरा दिवसांनी पाणी देऊ शकता.

आणि तुम्हाला जर तुमच्या तुर पिकावर कीड दिसत असेल तर तुम्ही तुमच्या कृषी सेवा केंद्रामधून तूर फवारणीसाठी योग्य औषधे देखील घेऊन फवारणी करू शकता. तुरीवरील औषधे कोणती फवारावी हे तुम्ही कृषी सेवा केंद्रावर नक्की विचारा. ते तुम्हाला योग्य माहिती देतील.

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही तुर पिकाची काढणी केल्यानंतर आलेल्या शेंगा व्यवस्थित एखाद्या चवाळ्यावर घ्या. आणि त्यावेळी अवकाळी पाऊस असल्यास त्या शेंगा व्यवस्थित झाकून ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो त्या शेंगा उपनेर मधून काढून घ्या आणि तूर विकण्या योग्य बनवा. त्याचबरोबर तुम्हाला त्यावेळी तुर पिकाला बाजार भाव नसेल तर तुम्ही काही दिवस तूर घरामध्ये देखील ठेवू शकता.

आणि ज्या वेळेस तुर पिकाला बाजार भाव चांगला मिळेल त्यावेळेस तुम्ही तुर पिकाची विक्री करू शकता. त्याचबरोबर तुर पिकाला जर योग्य बाजार भाव मिळत नसेल तर तुम्ही तुरीची तुरडाळ बनवून बाजारामध्ये चांगल्या किमतीत विकू शकता. आणि या पद्धतीने तुम्ही तूर पिकाची लागवड करून नफा कमवू शकता.Tur Pik Lagavd Mahiti

Leave a Comment