Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Agriculture information

Agriculture information: भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखले जाते, आपण पाहतो की भारतामध्ये प्रामुख्याने शेती हा व्यवसाय केला जातो. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये शेती करत असताना आपण काहीतरी जोडधंदा करावा, अशी कल्पना असते परंतु जोडधंदा करत असताना कोणता करावा व त्यासाठी लागणारा खर्च आपल्याकडून होईल का असा विचार शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतो.तर आपण आज या लेखात पाहणार आहोत की शेती सोबत आपण कोणकोणता जोडधंदा करू शकतो.

आपण अशा शेती संबंधित व्यवसायाबद्दल माहिती पाहणार आहोत की ती शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल. शेती बरोबरच जोडधंदा करत असताना शेतकऱ्यांना त्यामध्ये भरपूर फायदा होत असतो म्हणूनच शेतकरी शेती सोबत जोडधंदा निवडत असतात. शेतीबरोबरच जोडधंदा करत असताना शेतकऱ्यांना भरपूर मेहनतही घ्यावी लागते. तेव्हाच त्या व्यवसायातून जास्तीत जास्त नफा राहतो. शेतीला जोडधंदा म्हणून आपण कोणते पाच व्यवसाय सुरू करू शकतो आणि त्या पाच व्यवसाय बद्दल सविस्तर माहिती या बातमीमध्ये दिली जाणार आहे.ही माहिती लक्षात घेण्यासाठी व जोडधंदा करण्यासाठी हा लेख आपण पूर्ण वाचावा. हा लेख पूर्ण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की शेतीला जोडधंदा म्हणून आपण कोणता व्यवसाय करू शकतो त्याचबरोबर तो व्यवसाय कसा करायचा हे आपल्याला माहिती होईल.

शेतीला जोड धंदा म्हणून आपण हे पाच व्यवसाय करू शकतो ते म्हणजेच मधमाशी पालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन आणि गाई म्हशी पालन व्यवसाय. या पाच व्यवसायांबद्दल आपण सविस्तर माहिती या बातमीमध्ये पाहणार आहोत. हे व्यवसाय करण्यासाठी आपल्याला किती जागेची गरज आहे. त्याचबरोबर आपल्याला या व्यवसायामधून किती नफा मिळतो आणि त्यासाठी आपल्याला किती खर्च करावा लागतो.या संदर्भात आपण या बातमीमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत.Agriculture information

आपण शेतीला जोडधंदा म्हणून मधमाशी पालन व्यवसाय बद्दल प्रथम माहिती पाहूया. मधमाशी पालन हा व्यवसाय शेती करत असताना आपल्याला खूप फायद्याचा त्याचबरोबर सोप्या पद्धतीने करता येतो. मधमाशी पालन करण्यासाठी जर आपल्या आजूबाजूला फुलाचे झाड असतील तर अजूनच याचे उत्पन्न वाढू शकते. मधमाशी पालन हा व्यवसाय करत असताना या व्यवसायातील काम हे आपण शेतीच्या कामाप्रमाणे ही करू शकतो. शेतीसोबत जोडधंदा करत असताना सरकार सुद्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत असते, त्याचबरोबर काही गरज शेतकऱ्यांना मदत देखील करत असतात. या व्यवसायातून शेतकऱ्यांची मोठी प्रगती होऊ शकते. मधमाशी पालन हा व्यवसाय करण्यासाठी अनेक संस्था कडून आपल्याला मधमाशी पालना विषयी शिक्षणही दिले जाते. त्याचबरोबर या क्षेत्रांतर्गत कृषी विभाग किंवा फलोत्पादन विभागासाठी मदत दिली जाते.

मधमाशी पालन सारखा दुसरा व्यवसाय म्हणजेच मत्स्य पालन हा व्यवसाय देखील आपण शेतीला जोडधंदा म्हणून करू शकतो. मत्स्य पालन व्यवसाय हा आपण कमी खर्चात करू शकतो. मत्स्य पालन हा व्यवसाय करत असताना आपल्याला जास्त नफा मिळवता येतो. आपण पाहतो की बाजारामध्ये तेलाला त्याचबरोबर माशाचे मास यांना खूप मोठी मागणी आहे. दैनंदिन जीवनामध्ये या व्यवसायाला खूप मोठा वाव आहे. हा व्यवसाय करत असताना जर आपल्या शेतात तलाव किंवा विहीर असेल तर आपल्याला अजूनच चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय करता येईल.

जर आपल्या शेतात तलाव किंवा विहीर नसेल तर आपण मत्स्य पालन हा व्यवसाय घरच्या टाकीत सुद्धा करू शकतो. मत्स्यपालन व्यवसाय आपण कमी खर्चात करून जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. मत्स्य पालन व्यवसाय करत असताना सरकारकडून सुद्धा आपल्याला काही मदत दिली जात आहे. आपण शेतीला जोडधंदा म्हणून हा मत्स्यपालन व्यवसाय करत असल्यास सरकार आपल्याला बँकांच्या माध्यमातून मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डही देत आहे. आपल्याला सरकारने हे क्रेडिट कार्ड दिल्यानंतर आपण याद्वारे मत्स्य पालक हमीशिवाय 1.60 लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकतो. आपल्याकडे जर किसान क्रेडिट कार्ड असेल तर आपण व्यवसाय करण्यासाठी जास्तीत जास्त रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतो.Agriculture information

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

कुक्कुट पालन व्यवसाय आपण शेतीला जोडधंदा म्हणून करू शकतो. हा व्यवसाय करण्यासाठी देखील आपल्याला जास्त खर्च करण्याची गरज नाही या व्यवसायाची सुरुवात आपण दोन-चार कोंबड्यांपासून सुद्धा करू शकतो. दोन-चार कोंबड्या पासून जरी व्यवसाय सुरू केला तरी आपण त्या व्यवसायाला काही दिवसानंतर खूप मोठया व्यवसायात रूपांतर करू शकतो. हा व्यवसाय करत असताना आपल्याला दिवस-रात्र तिथे बसून राहण्याची गरज नाही आपण दुसरे काम करत करत सुद्धा या व्यवसायाला सुरुवात करू शकतो. सरकार अशा छोट्या-मोठ्या व्यवसायासाठी मदत करत आहे.

या व्यवसायालाच पोल्ट्री म्हणून देखील ओळखले जाते. हा व्यवसाय करत असताना कोंबडी देखील विकली जाते त्याचबरोबर तिने दिलेली अंडी सुद्धा विकतात. दैनंदिन जीवनामध्ये या व्यवसायाला खूप मोठी मागणी आहे.जरी आपल्याकडे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसले तरीसुद्धा सरकार आपल्याला मदत करते. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला 25 टक्के निधीचा लाभ दिला जातो. आपण आपल्या घराजवळ सुद्धा हा व्यवसाय करू शकतो. बँक काही आता हा व्यवसाय चालू राहण्यासाठी कर्ज देत आहेत. कुक्कुट पालन हा व्यवसाय करून आपण कमी खर्चात चांगला नफा कमवू शकतो.

बऱ्याच दिवसापासून शेळीपालन हा व्यवसाय देखील शेतीला जोडधंदा म्हणून केला जातो. शेळीपालन या व्यवसायामध्ये आपल्याला जास्त खर्चाची गरज नसते.या व्यवसायाची सुरुवात आपण एका शेळी पासून सुद्धा करू शकतो. शेळी पालन व्यवसाय करत असताना आपल्याला काळजी घेणे खूप आवश्यक असते. या व्यवसायासाठी आपल्याला घराच्या जवळच थोडीशी जागा असणे गरजेचे आहे. या व्यवसायाचा फायदा हा आपल्याला दोन कामासाठी होतो तो म्हणजेच दुधासाठी आणि मासांसाठी होतो. आपल्याला हा व्यवसाय करायचं म्हणलं तर प्रथमता आपल्याला हा व्यवसाय करण्यामागचा आपला उद्देश काय आहे हे ठरवावे लागेल. कारण यामध्ये आपल्याला शेळीची जात ही निवडावी लागते. शेळी पालन या व्यवसायासाठी राज्य सरकार मदत करत आहे. या व्यवसायामध्ये आपल्याला जास्त धावपळ करण्याची गरज नाही त्याचबरोबर आपण हा व्यवसाय कमी पैशांमध्ये करून जास्त नफा मिळवू शकतो.

बरेचसे शेतकरी शेती करत असताना गाई म्हशी पालन देखील करत असतात. गाई म्हशी पालन हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो. हा व्यवसाय करत असताना सुद्धा आपल्याला प्रथमता कोणती गाय पाळायची आहे त्याचबरोबर कोणती म्हैस पाळायची आहे हे आपण ठरवावे. या व्यवसायासाठी सुद्धा सरकारकडून मदत होत आहे. या व्यवसायाबद्दल आपल्याला भरपूर माहिती असेल परंतु हे माहीत नसेल की तुम्हाला बँकेकडून जास्त प्रमाणात कर्ज दिले जाईल. आपण शेतीसोबत जोडधंदा करत असताना शासनाच्या अनुदानाचा लाभ घ्यायला हवा. अनेक सरकारी आणि गैरसरकारी संस्था ह्या शेती संबंधित व्यवसायासाठी दहा लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देतात. हा व्यवसाय करून आपण खूप मोठ्या प्रमाणात दूध मिळू शकतो. दुधाला जास्तीत जास्त मागणी आहे.

आपण यामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून करता येणाऱ्या पाच व्यवसायांबद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे. ही माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपण जर शेतीला जोडधंदा म्हणून वरील व्यवसायांपैकी कोणताही व्यवसाय केला तरी सुद्धा आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त नफा मिळू शकतो. वरील पाच पैकी कोणताही व्यवसाय करत असताना आपल्याला जर पैशाची अडचण येत असेल तर राज्य सरकारकडून व्यवसाय करण्यासाठी मदत होईल.Agriculture information

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *