Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Food Tips

Food Tips थंडीच्या दिवसांमध्ये कोणते अन्नपदार्थ घेतले पाहिजे आणि ते कधी घेतले पाहिजे हे आपल्याला माहीत नसते. थंडीच्या दिवसात थंड पदार्थ खाल्ल्याने आपल्याला सर्दी होऊ शकते. तसेच आपण दही हे थंड असते असं म्हणतो आणि ते हिवाळ्याच्या दिवसात घेणे टाळत असतो. परंतु आयुर्वेदानुसार दही आहे थंड नसते. हिवाळ्यात दही खाल्ल्याने आपले वजन नियंत्रणात राहते. तसेच हिवाळ्यात कोणते पौष्टिक सुपरफुड पदार्थ खाल्ले पाहिजे व ते कोणत्या वेळेला खाल्ले पाहिजे. याबद्दल माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.

दिवाळी झाल्यानंतर थंडी जाणवायला सुरुवात होती.आपण आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी या बातमीमध्ये सांगितलेले तीन प्रकारचे सुपरफुड पदार्थांचा आहारात समावेश करायला पाहिजे, त्याचबरोबर आपली रोगप्रतिकार शक्ती ही हिवाळ्यामध्ये चांगली असावी आणि आपल्याला जास्त थंडीचा त्रास होऊ नये, यासाठी सेलिब्रिटी आहार तज्ञ ऋतुजा दिवेकर यांनी दिला आहे.

आपण पाहतो की थंडी सुरू झाली की आपण स्वेटर, स्कार्फ आणि जर्किन असे कपडे वापरण्यास सुरुवात करतो. थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी ही थंडी वाजत असते त्याचबरोबर रात्रीच्या वेळी सुद्धा थंडी सुरूच असते. आपण पाहिले तर दिवसभराचे वातावरण हे गार असते त्यामुळे आपण स्वेटर वापरण्यास सुरुवात करतो. थंडीचा कडाका वाढण्याआधी आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला सुरुवात करावी म्हणून आपण हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे पदार्थ आहारात घेतले पाहिजे.

ऋतुजा दिवेकर यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या आहारात डिंक या पदार्थाचा वापर केला पाहिजे. थंडी सुरू झाली की लगेच आपण आपल्या घरामध्ये डिंकाचे लाडू बनवून ठेवायचे आणि त्याचे सेवन आपण थंडीच्या दिवसात केले पाहिजे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये डिंकाचे सेवन करणे अतिशय फायद्याचे मानले गेले आहे. पोट साफ न होणे, सांधेदुखीचा त्रास असे आजार अनेक व्यक्तींना थंडीच्या दिवसात होण्यास सुरुवात होते. असे आजार आपल्याला थंडीच्या दिवसात जाणू नये त्यासाठी आपण आपल्या आहारात डिंकाचा वापर करावा. डिंक हा हे दोन्ही त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. डिंक हा बोंडिंग सिटी वाढवण्यासाठी देखील मदत करतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात डिंकाचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे ठरते. त्यामुळे डिंकाचे सेवन हे आपण लाडू किंवा हलवा या माध्यमातून वेळेवर त्याचबरोबर रोज करणे महत्त्वाचे आहे.

ऋतुजा दिवेकर यांनी सांगितल्याप्रमाणे दुसरे सुपर फूड म्हणजेच हिरवा लसूण. या हिरव्या लसुणाचे सुद्धा आपण नियमितपणे आपल्या आहारात सेवन करणे महत्त्वाचे आहे. हिरवा लसूण म्हणजेच लसूणाची पात. ग्रामीण भागात हिरव्या लसुणाला लसुणाची पात म्हणून ओळखले जाते. आपण पाहतो की लसुन या पिकाची लागवड देखील हिवाळ्यातच केली जाते त्यामुळे ती हिरवी पात आपल्याला सहजपणे मिळते. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी पडण्यास सुरुवात होते. बऱ्याच व्यक्तींना त्वचा कोरडी पडण्याचा त्रास होतो हा त्रास होऊ नये, म्हणून आपण हिवाळ्यामध्ये लसणाची पात खाणे महत्त्वाचे आहे. हिरव्या लसुणाच्या पातीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे या हिरव्या पातीचे सेवन हिवाळ्यामध्ये केलेले आपल्या शरीरासाठी चांगले मानले जाते. भाजी किंवा चटणीच्या माध्यमातून आपण लसुणाची पात ही दिवसभरात एकदा तरी अवश्य आपल्या आहारात घ्यावी. हिवाळ्यामध्ये या लसणाच्या पातीचे सेवन केल्यास आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो.

हिवाळ्यामध्ये तिसरे सुपर फूड म्हणून शलगम किंवा सलगम या पदार्थाला ओळखले जाते. या भाजीमध्ये आवश्यक असणारे विटामिन्स आणि पौष्टिक घटकही असतात. या भाजीचे लोणचे केले जाते. हिवाळ्यामध्ये आपण आंब्याचे लोणचे न खाता शलगम या पदार्थाचे लोणचे खाल्ले पाहिजे. डोळ्याचे आरोग्य जपण्यासाठी जे व्हीटॅमिन्स आवश्यक असतात. ते व्हीटॅमिन्स सलगम या पदार्थांमध्ये असतात. सलगम या भाजीतून आपल्याला भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक मिळतात. शलगममध्ये फायबर, मायक्रोन्यूट्रियन्स हे देखील मोठ्या प्रमाणात असतात.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

ऋतुजा दिवेकर यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर थंडीच्या दिवसांमध्ये हे 3 सुपर पुढचे सेवन केले तर आपल्याला थंडी जाणवणार नाही. त्याचबरोबर थंडीतील कोणत्याही समस्या जाणवणार नाहीत. हे 3 सुपर फूड आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत.Food Tips

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *