Soyabean Pikachi Lagavad Marathi Mahiti: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. ही माहिती सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची असणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची लागवड करण्याची इच्छा आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी देखील ही माहिती तेवढीच महत्त्वाची असणार आहे.
आपण या बातमीमध्ये काय काय पाहणार आहोत? 1 सोयाबीन पिकाची लागवड कशी करावी 2 सोयाबीन पिकाची लागवड करण्याअगोदर जमिनीची मशागत कशी करावी 3 सोयाबीन पिकाची लागवड कोणत्या जमिनीत करणे योग्य आहे 4 सोयाबीन पिकाचे सुधारित वाण कोणते आहे 5 सोयाबीन पिकाची पेरणी कोणत्या वेळी करावी 6 सोयाबीन पिकाची काढणी कधी करावी 6 सोयाबीन पिकाचे खत व्यवस्थापन 7 सोयाबीन पिकामध्ये अंतर मशागत कशी करावी 8 सोयाबीन पिकाचे आजचे बाजार भाव अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.Soyabean Pikachi Lagavad Marathi Mahiti
शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक हे तेलबिया म्हणून सर्वाधिक लोकप्रिय पीक बनले आहे. त्याचबरोबर सोयाबीन पिकाला महाराष्ट्र मध्ये नगदी पीक म्हणून देखील ओळखले जात आहे. त्याचबरोबर अनेक भागात सोयाबीनला पिवळे सोने म्हणून देखील ओळखले जात आहे. त्याचबरोबर सोयाबीन पिकांमध्ये तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 40% प्रथिने आहेत. आणि १९% खाद्यतेल आहे. आणि याच कारणामुळे जागतिक बाजारात देखील सोयाबीन पिकाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि यामुळे एकूण तेल उत्पन्नापैकी अंदाजे 58% सोयाबीन तेल वापरले जाते.
यामुळे खाद्यतेलामध्ये सोयाबीनचे तेल वापरल्यामुळे सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच भारतीय बाजारपेठेत वाढले आहे. परंतु शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा बाजार भाव सध्या तरी बाजार समितीमध्ये मिळत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी वर्षानुवर्ष नाराज राहत आहेत.
परंतु तरीदेखील अलीकडच्या काळामध्ये सोयाबीन पिकाची लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचबरोबर सोयाबीन पिकाचे एका वर्षात तब्बल पाच दशलक्ष टन इतके उत्पन्न मिळते. त्याचबरोबर देशभरात जनावरांसाठी तसेच कुकूटपालनासाठी सोयाबीन पेंडींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. म्हणजेच सोयाबीन पासून जनावरांसाठी तसेच कुकूटपालनासाठी पोषक आहार बनवला जात आहे. याशिवाय सोयाबीन पासून सोया मिल्क तसेच सोया बिस्किट आणि सोयावाडी या सारखी तब्बल 100 पेक्षा जास्त पदार्थ सोयाबीन या पिकापासून बनवले जातात. यामुळे सोयाबीन या पिकाला देशभरात मोठे महत्त्व मिळाले आहे. चला तर मग सोयाबीन पिकाची लागवड कोणत्या जमिनीमध्ये करावी याबद्दल माहिती जाणून घेऊया.
सोयाबीन पिकाची लागवड कोणत्या जमिनीमध्ये करणे योग्य आहे
सोयाबीन पिकाची ही लागवड करण्यासाठी जमिनीचा प्रकार हा मध्यम ते भारी असावा. त्याचबरोबर तुमच्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगल्या प्रमाणात हवा. त्याचबरोबर तज्ञांच्या मध्ये जमिनीचा कलर गुलाबी असेल तर ही जमीन सोयाबीन साठी खूपच उत्तम असते. हलक्या जमिनीत सोयाबीनचे उत्पन्न घेतले जाऊ शकते परंतु या जमिनीमध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न कमी होऊ शकते. त्याचबरोबर माहितीनुसार ज्या जमिनीत जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते त्या जमिनीचा सोयाबीनचे उत्पन्न जास्त प्रमाणात निघते. म्हणजेच अंदाजे जमिनीचा सामू हा सहा ते साडेसहा यादरम्यान असावा.
सोयाबीन पिकाची लागवड करण्यासाठी कशा प्रकारचे हवामान असावे
सोयाबीन पिकाची पेरणी करण्यासाठी कशी हवामान असावे याबद्दल बोलायचे झाले तर सोयाबीन पिकाची पेरणी ही उष्ण हवामानात केली पाहिजे. म्हणजेच सोयाबीनची पेरणी करताना तापमान हे 18 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान असावे. विशेष म्हणजे सोयाबीन पिकाची पेरणी (लागवड) ही खरीप हंगामामध्ये केली जाते. आणि खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकासाठी 600 ते 1000 mm पर्जन्यमानाची आवश्यकता असते.
सोयाबीन पिकाची पेरणी करण्याअगोदर कशी मशागत करावी
सोयाबीन पिकाची पेरणी करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला पूर्वमशागत करणे खूप गरजेचे असते. पूर्व मशागत करण्यामध्ये आपण सुरुवातीला खोल नांगरून उभ्या आड्या करून घ्याव्यात. त्यानंतर जमिनीतून वर आलेल्या मुळ्या आणि इतर झाडांच्या काट्या वेचून शेताबाहेर फेकाव्यात. त्यानंतर शेत भुसभुशीत व्हावे यासाठी कुळवाच्या तुना पाळ्या घ्याव्यात. त्याचबरोबर तुम्हाला जर अधिक उत्पन्न सोयाबीन पासून मिळवायचे असेल तर तुम्ही तुमच्या जमिनीत पोजलेलं शेणखत एकरी दोन टायल्या टाकू शकता.Soyabean Pikachi Lagavad Marathi Mahiti
यामुळे तुम्हाला सोयाबीन पिकाची वाढ तसेच उत्पन्न जास्त प्रमाणात मिळेल. त्याचबरोबर सध्या रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खत वापरण्यावर शेतकरी जास्त प्रमाणात भर देत आहेत. रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खत सध्या महाग झाले आहेत परंतु या खतामुळे आपल्या शेती पिकात जास्त प्रमाणात उत्पन्न निघते.
सोयाबीन पिकाची पेरणी कधी करावी?
सोयाबीन पिकाची पेरणी करण्या अगोदर आपल्या शेतामध्ये पुरेशी ओल आहे की नाही हे तपासणे खूप गरजेचे असते. त्याचबरोबर सोयाबीन पिकाची पेरणी केल्यानंतर वापस्यावर पाणी व्यवस्थापन करावे. सोयाबीनची पेरणी ही अंदाजे १५ जून ते 15 जुलै या दरम्यान करावी. सोयाबीनची पेरणी ही 45 गुणिले पाच सेमी अंतरावर करू शकता. त्याचबरोबर सोयाबीनची पेरणी करताना पाच सेमी पेक्षा जास्त सोयाबीनचे बियाणे जमिनीमध्ये जास्त जाऊ नये. याची काळजी नक्की घ्यावी.
सोयाबीन पिकामध्ये अंतर मशागत कशी करावी?
सोयाबीन पिकामधील सुरुवातीचे सहा आठवडे ते सात आठवडे हे तन वाढण्यासाठी असतात. म्हणजेच हे आठवड्यात सोयाबीन पिकामध्ये गवत वाढण्यासाठी खूपच पोषक असतात. यामुळे या आठवड्यात आपले पीक तनविरोहित ठेवणे खूपच गरजेचे असते. यासाठी तुम्ही 20 ते 30 दिवसांनी एक कोळपणी नक्की करून घ्या. आणि त्यानंतर लगेचच पंधरा दिवसांनी आणखीन एक ओळखणे नक्की करा. ही कोळपणी दुपारच्या पारी द्यावी. कारण या वेळेस कोळपणी केल्यानंतर शेतातील तन जाग्यावर जळते.
सोयाबीन पिकाचे आजचे बाजार भाव किती आहेत याबद्दल माहिती जाणून घेऊयात..
शेतकरी मित्रांनो आज सोयाबीन पिकाची अनेक बाजार समितीत कमी प्रमाणात आली होती. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या बाजार समिती सोयाबीनची आवक किती आली होती. त्याचबरोबर सोयाबीनचे कमीत कमी बाजार भाव, आणि सोयाबीनचे जास्तीत जास्त बाजार भाव आणि सोयाबीनचे सर्वसाधारण बाजार भाव खालील प्रमाणे जाणून घेऊयात.
1 आज लासलगाव या बाजार समितीचे सोयाबीनची 205 क्विंटल ची आवक आली आहे. आणि या बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी बाजार भाव हा तीन हजार रुपये मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा ४४५० रुपये मिळाला आहे आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 4350 रुपये मिळाला आहे.
2 त्याचबरोबर मित्रांनो जळगाव या बाजार समितीत सोयाबीनची 112 ची आवक आली आहे. आणि या बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी बाजार भाव हा 4200 रुपये मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 4300 रुपये मिळाला आहे. आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 4150 रुपये मिळाला आहे.
3 यासोबतच आज अचलपूर या बाजार समितीत सोयाबीन ची आवक खूपच कमी प्रमाणात आली होती. मात्र आज या बाजार समिती सोयाबीनला चांगल्या प्रमाणात बाजार भाव मिळाला आहे. अचलपूर या बाजार समितीत आज केवळ पंधरा क्विंटल ची आवक आली आहे. आणि या बाजार समिती सोयाबीनला कमीत कमी बाजार भाव हा 4300 मिळाला आहे. आणि या बाजार समिती सोयाबीनला जास्तीत जास्त बाजार भाव हा 4850 रुपये मिळाला आहे. आणि या बाजार समितीत सोयाबीनला सर्वसाधारण बाजार भाव हा 4500 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही इतर सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव तुमच्या जवळच्या बाजार समितीमध्ये जाऊन पाहू शकता.
सोयाबीन पिकातून शेतकरी किती क्विंटल पर्यंत उत्पन्न घेऊ शकतात…
सोयाबीन पिकातून शेतकरी चांगल्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकतात परंतु शेतकऱ्यांनी लावलेल्या शेतावर शेतकऱ्याचे उत्पन्न अवलंबून असते. त्याचबरोबर शेतकऱ्यांवर मशागत केल्यानंतर शेतामध्ये शेणखत टाकले असेल तर त्या शेतामधील सोयाबीनचे उत्पन्न जास्त प्रमाणात असेल. परंतु साधारणपणे सोयाबीन पासून शेतकरी हेक्टरी 25 ते 30 क्विंटल पर्यंत उत्पन्न सहज मिळवू शकतात.Soyabean Pikachi Lagavad Marathi Mahiti