Chiku Pikachi Lagavad Mahiti: शेतकरी मित्रांनो, आपण सर्वजण पाहत आहोत की सध्या दिवसेंदिवस आधुनिक शेतीकडे शेतकरी वळले आहेत. आणि या कारणामुळे अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्याचा उत्साह देखील वाढला आहे. त्याचबरोबर या उत्साहामुळे अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे शेती करत आहेत. परंतु अनेक वेळा शेतकऱ्यांना संपूर्ण शेतीमधील माहिती नसल्यामुळे तशी आधुनिक शेती करता येत नाही. आणि या कारणामुळे अनेक शेतकरी आधुनिक शेती करण्यापासून वंचित राहतात.
परंतु आता शेतकऱ्यांसाठी सरकारने नवनवीन योजना घोषित केले आहेत आणि या योजनांमुळे शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती त्यांच्या स्मार्टफोन मोबाईलवर मिळत आहेत. त्याचबरोबर नवनवीन उद्योग विषयी तसेच नवनवीन शेतीतील प्रयोग विषयी झटपट माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर मिळत आहे यामुळे शेतकरी स्वावलंबी होत चालला आहे.
त्याचबरोबर अनेक शेतकरी आता स्मार्टफोन वापरू लागले आहेत त्याचबरोबर बदलत्या काळानुसार शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात बदलले आहेत. हवामानानुसार शेतकरी देखील आता पीक लागवड करत आहेत. हवामान जर खराब असेल तर शेतकरी दुसऱ्या पिकाची शोध घेतात. आणि ते पीक शेतीत घेतात आणि त्यापासून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवतात.
त्याचबरोबर सध्या आंबा, जांभळ, खजूर, मोसंबी, चिकू, संत्री अशा इत्यादी फळ पिकांची लागवड करून शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत. त्याचबरोबर आता अनेक शेतकरी चिकू या फळ पिकाकडे देखील वळले आहेत. चिकू पिकापासून अनेक शेतकरी लाखोंमध्ये उत्पन्न घेत आहेत. यामुळे कमी क्षेत्रावरील तसेच जास्त क्षेत्रावरील प्रयत्न करत आहेत. चला तर मग शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊया की चिकू पिकासाठी कोणत्या पद्धतीच्या हवामान असावे? चिकू पिकाची लागवड करण्यासाठी कशा पद्धतीची माती असावी? चिकू पिकाला पाणी व्यवस्थापन कसे असावे? अशी खूप पिकाला कसे द्यावे? असे संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात…
शेतकरी मित्रांनो पिकाची लागवड करण्यासाठी उष्ण व दमट वातावरण असणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर चिकू पिकाला जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. यामुळे चिकू पिकाला जास्तीत जास्त पाऊस असलेला प्रदेश लागतो. यामुळे तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात पाणी साठा असेल तर तुम्ही चिकू पिकाची लागवड नक्की करू शकता.
त्याचबरोबर चिकू पिकासाठी मातीची देखील निवड करणे खूप गरजेचे आहे. तुमच्याकडे जर पाण्याचा चांगला पद्धतीने निसरा होणारे जमीन असेल तर तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे. लागवड करण्यासाठी मध्यम प्रकारची जमीन देखील असणे आवश्यक आहे आणि काळा कलरची म्हणजेच काळसर जमीन असावी.
चुकू पिकाच्या सुधारित जाती आपण खालील प्रमाणे पाहुयात..
चिकू पिकाची लागवड अनेक शेतकरी करत आहेत यामुळे नवनवीन जाती सध्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत. चला तर मग काही विशिष्ट जातींबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहूयात..
चिकू पिकाची कालीपत्ती या जातीच्या झाडांची पाने हिरवी व फळे गोल अंडाकृती असतात. त्याचबरोबर या झाडापासून मिळालेल्या फळांची साल ही पातळ असते. आणि त्याचबरोबर गर हा गोड असतो. त्याचबरोबर या जातीच्या चिकूला जास्त प्रमाणात फळे येतात
त्याचबरोबर मित्रांनो क्रिकेटबॉल या जातीची देखील शेतकरी जास्तीत जास्त प्रमाणात लागवड करत आहेत. या चिकू जातीच्या झाडाला चिकू मोठे गोलाकार येतात. त्याचबरोबर या चिकू झाडाचे चिकू हे कमी प्रमाणात गोड असतात परंतु गर पण एकदा राहतो. आणि या झाडाला देखील भरपूर प्रमाणात फळे येतात.
त्याचबरोबर मित्रांनो छत्री या चिकू पिकाच्या झाडाला मोठ्या प्रमाणात फळे येतात. त्याचबरोबर या झाडाच्या फांद्या ह्या छत्रीप्रमाणे असतात. त्याचबरोबर या चिकूची झाडांची पाने फिकट हिरव्या रंगाचे असतात. त्याचबरोबर या झाडांच्या फळाचा आकार हा कालीपत्तीच्या फळाप्रमाणेच असतो. परंतु, या झाडाची गोडी देखील कमी असते.
चिकू झाडाला पाणी व्यवस्थापन देखील खूपच महत्त्वाचे आहे.
शेतकरी मित्रांनो कोणतेही झाड असो त्यासाठी पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे चिकू झाडाची लागवड केल्यानंतर चिकू झाडाला किती दिवसांनी पाणी द्यावे. म्हणजेच उन्हाळ्यामध्ये किती दिवसांनी पाणी द्यावे? हिवाळ्यामध्ये किती दिवसांनी चिकूला पाणी द्यावे? त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये छकुला पाणी द्यावे की नाही. अशी संपूर्ण माहिती शेतकऱ्याकडे नक्की असावी.
शेतकरी मित्रांनो तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चिकू पिकाला हिवाळ्यामध्ये दिवसांच्या अंतरावर पाणी व्यवस्थापन करावे. आणि त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या उष्णतेवर त्याचबरोबर तुमच्या जमिनीतील पाण्याच्या निचऱ्यावर पाणी द्यावे. परंतु पाच दिवसांत पाणी देणे योग्य राहील. किंवा त्या अगोदर देखील तुम्ही चिकूचा पिकाला उन्हाळ्यामध्ये पाणी देऊ शकता.
चिकू पिकापासून उत्पन्न किती मिळते त्याचबरोबर चिकू पिकाची काढणी कशी करावी…
चिकू पिकाला एक वेळेस फळ आल्यानंतर लगेच फलधारणेपासून चिकूला फळे येण्यासाठी केवळ 150 ते 160 दिवस लागतात. परंतु सुरुवातीला फळ येण्यासाठी चिकूला पाच ते सहा वर्षे लागतात. आणि त्यानंतर प्रत्येक चिकूच्या झाडापासून शंभर 500 फळांच्या प्रमाणात वाढ होत जाते.
म्हणजेच मित्रांनो तुमचे झाड जर पाच वर्षाचे झाले तर त्या झाडाला साधारणतः शंभर फळे येऊ शकतात. त्याचबरोबर तुमचे झाड जर दहा वर्षाचे झाले तर त्या झाडाला तब्बल 500 फळे येऊ शकतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुमचे झाड पंधराव्या वर्षी 1500 ते 1600 फळे देऊ शकते. त्याचबरोबर वीस वर्षानंतर तुमच्या झाडाची फळे 20 ते 3000 दरम्यान देखील होऊ शकतात. यामुळे तुम्ही प्रत्येक वर्षी बसून चिकू पिकातून नफा कमवू शकता.
त्याचबरोबर मित्रांनो, चिकू पिकाची काढणी केल्यानंतर तुम्ही तुमच्या घरापासून देखील चिकूची विक्री करू शकता. ठोक बाजारात चिकूची 100 किलो किंवा पन्नास किलो विक्री केली जाऊ शकते. त्याचबरोबर किरकोळ बाजारांमध्ये देखील तुम्ही पिकाची विक्री करू शकता.
परंतु मित्रांनो तुम्ही जर चिकू पिकाची किरकोळ बाजारांमध्ये विक्री केली तर तुम्हाला दहा पैसे जास्त मिळतील. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर ठोक बाजारात 1000 रुपये मिळत असतील तर तुम्हाला किरकोळ बाजारामध्ये एक हजार दोनशे रुपये पर्यंत पैसे मिळू शकतात. म्हणजेच तुम्हाला मित्रांनो किरकोळ बाजार मध्ये दोनशे रुपये जास्त मिळतील.
यामुळे तुम्ही किरकोळ बाजारांमध्ये देखील चिकू पिकाची विक्री करू शकता. परंतु यासाठी तुम्हाला चिकू घेऊन बाजारामध्ये बसावे लागेल. त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या चिकूच्या झाडाला फळे येण्यास सुरुवात झाल्यानंतर तुम्ही चिकूच्या झाडावरील फळ काढण्यासाठी तुम्ही अतुल झेल्याचा वापर करू शकता.Chiku Pikachi Lagavad Mahiti
त्याचबरोबर तुमच्या हाताला जर चिकू येत असेल तर त्यावेळेस तुम्ही चिकूची काढणी करू शकता. परंतु ज्या वेळेस तुमच्या हाताला चिकू येणार नाहीत त्यावेळेस तुम्ही झेल्याचा वापर करून चिकू काढू शकता. त्याचबरोबर तुम्ही इतर कोणतेही यंत्र वापरून चिकू फळ काढू शकता आणि बाजारामध्ये विकू शकता.
त्याचबरोबर मित्रांनो आपण जर एका झाडापासून १००० फळ धरले तर, ते फळ साधारणता शंभर किलो असतील. आणि जर तुम्हाला एक किलो ला 30 रुपये भाव मिळाला तर तुम्ही एका झाडापासून वर्षाला तीन हजार रुपये कमवू शकता.
त्याचबरोबर असे तुमच्याकडे 50 झाडे असतील तर तुम्ही वर्षाला घरी बसून तीस हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता. परंतु यासाठी तुम्हाला पहिले पाच वर्ष ते सात वर्ष काही नफा मिळणार नाही. त्याचबरोबर एखाद्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला चिकूच्या झाडाला पाणी देण्यासाठी कमतरता भागली तर तुमचे चिकूचे झाडे जळू शकतील.
यामुळे तुम्ही चिकूची लागवड करण्या अगोदर पाणी पातळी नक्की तपासा. त्याचबरोबर चिकू पिकांमध्ये फळातील बी पोखरणारी अळी देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे या अळी विरोधात औषधाची फवारणी करणे खूपच आवश्यक आहे. यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्र वर जाऊन कीटकनाशक खरेदी करू शकता. आणि या अळीवर नियंत्रण मिळो शकता.
त्याचबरोबर तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप वर मेसेज करून किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून याबद्दल सविस्तर माहिती विचारू शकता. तुमचा प्रश्नांची उत्तरे आम्ही नक्की देऊ… धन्यवाद..!!Chiku Pikachi Lagavad Mahiti