Kapus lagavd sampurn mahiti: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत कापूस पिकाची लागवड कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण कापूस पिकाची लागवड करण्या अगोदर मशागत कशी करावी? कापूस पिकाचे बियाणे कोणते निवडावे? कापूस पीक पाणी व्यवस्थापन कसे करावे? कापूस पिकातील कीड व्यवस्थापन कसे करावे? कापूस पिकाची काढणी कशी करावी? कापूस पिकाची विक्री कधी करावी? कापूस पिकाला सध्या सरासरी किती भाव आहे? त्याचबरोबर इतर संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.
शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची पेरणी करणे अगोदर कापूस पीक लावायचे आहे त्या जमिनीमध्ये पहिल्यांदी नांगरणी करून घ्यावे. त्यानंतर उन्हाळ्यात कमीत कमी दोन महिने तरी जमिनीने ऊन खावे. त्यानंतर जमिनीमध्ये असलेल्या काड्या, मुळ्या किंवा इतर कोणतीही वस्तू उचलून राहणार बाहेर टाकावे. यामुळे आपल्या शेतामध्ये स्वच्छता राहील. आणि आपल्याला कापूस पिकाची लागवड करताना सोपे जाईल.
पाऊस पडल्यानंतर कापूस पिकाची ज्या ठिकाणी लागवड करायची आहे त्या ठिकाणी पाळी(कोळपणी करावी) मारून घ्यावी. त्याचबरोबर तुमच्याकडे जर ठिबक असेल तर तुम्ही ठिबक हातरून ठिबक वरील पॉईंट नुसार कापूस पिकाची लागवड करू शकता. त्याचबरोबर तुमची कापूस पीक मोठे होत असेल तर तुम्ही एका फोनवर एक बी अशा पद्धतीने लागवड करू शकता. आणि तुमच्या शेतामध्ये कापूस पीक मोठे होत नसेल तर तुम्ही एका पॉईंटवर दोन बिया देखील लावू शकता. यामुळे तुम्हाला अधिक उत्पन्न मिळेल. त्याचबरोबर तुम्ही नागमोडी रेषेध देखील त्या ठिकाणी कापूस पिकाची लागवड करू शकता.
त्याचबरोबर मित्रांनो माहितीनुसार कापूस पिकाला राज्यभरात नगदी पीक म्हणून देखील ओळखले जाते. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये कापूस पिकाला पांढरे सोने देखील म्हटले जाते. त्याचबरोबर राज्यभरात कापूस पिकाची लागवड ही सर्वात जास्त प्रमाणात केली जाते. आणि कापूस पिकाला आता सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर कापसाचे बाजार भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.
कापूस पिकाची लागवड केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अंतर पिके देखील घेऊ शकता. आणि चांगल्या प्रमाणात नफा कमवू शकता. कापूस पिकाची लागवड ही 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान असल्यानंतर करावी. कारण तज्ञांच्या मते या तापमानात कापूस पिकाची लागवड केल्यानंतर बियाण्यांची उगवण सोप्या पद्धतीने होते.
त्याचबरोबर तापमान जर 18 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असेल तर बियाण्यांची उगवण खूपच उशिरा होऊ शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर तज्ञांच्या म्हणण्यानुसार चाळीस अंश सेल्सिअस तापमानाच्या वर तापमान गेल्यानंतर कापूस पिकाची उगवण होऊ शकत नाही. मात्र हे तापमान कापूस पीक थोड्या वेळ म्हणजेच दोन ते तीन तास कालावधीसाठी सहन करू शकते जास्त काळ हे तापमान राहिल्यास कापूस पीक जागावर जळू शकते. असे तज्ञांची मान्य आहे.
कापूस पिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन योग्य आहे..
सध्या कापूस पिकाची लागवड ही कोणत्याही जमिनीमध्ये केली जाऊ शकते. कारण कोणत्याही जमिनीमध्ये कापूस पिकाची लागवड करणे योग्य बियाण्यांची निर्मिती केली जात आहे. यामध्ये जर तुमच्याकडे काळी फौजदार पाणी धरून ठेवणारे जमीन असेल तर या जमिनी तुम्हाला दुप्पट उत्पन्न मिळू शकते. म्हणजेच मित्रांनो पांढरा जमिनीमध्ये तुम्हाला दहा क्विंटल कापूस निघाला तर काळ्या जमिनीमध्ये तुम्हाला तब्बल वीस मिनिटं पर्यंत कापूस निघू शकतो. यामुळे तुम्ही कापूस पिकाची लागवड करण्यासाठी काळी कसदार जमीन निवडू शकता.
परंतु ही जमीन जर जास्त प्रमाणात ओलावा व जमीन पानातळ असेल तर तुमच्या पिकावर मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे तुम्ही या जमिनीचा अभ्यास करून या जमिनीमध्ये योग्य ते पीक घेऊ शकता.
कापूस पिकाची पेरणी कोणत्या वेळी करावी
कापूस पिकाची लागवड ही जून महिन्यामध्ये केली जाते. त्याचबरोबर विशेष म्हणजे अनेक जण सध्या कोरड्या रानात देखील कापूस पिकाची लागवड करत आहेत. यामुळे पाऊस पडल्यानंतर लगेचच कापूस पिकवून उगवून निघते. आणि कापूस पिकाला लवकरात लवकर पीक येण्यास सुरुवात होते. परंतु असे केल्यानंतर ज्यावेळेस पावसाचा सुरवातीला खंड पडल त्यावेळेस कापूस पीक नष्ट देखील होऊ शकते. परंतु तुमच्याकडे जर पाण्याचा स्त्रोत असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता.
कापूस पिकाची लागवड करण्यासाठी कोणते वाण निवडावे
तुमच्या जमिनीनुसार तुम्ही कापूस पिकाचे वाहन निवडू शकता. परंतु तुमच्याकडे जर चांगल्या पद्धतीची जमीन असेल तर तुम्ही पुढील प्रमाणे दिलेले वाण निवडू शकता.1 राशी सीड्स 659, कबड्डी (तुलसी सीड्स), सुपर कोट अशा इत्यादी वाहनांची निवड तुम्ही कापूस पिकाची लागवड करण्यासाठी निवडू शकता. त्याचबरोबर तुम्ही या बियाण्यांची लागवड एकरी 800 ते 900 ग्रॅम पर्यंत करू शकता.
त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही कापूस पिकाचे पाणी व्यवस्थापन कसे करावे
कापूस पिकाचे व्यवस्थापन जून जुलै महिन्यामध्ये करण्याची आवश्यकता नाही. परंतु या महिन्यात देखील पावसाने खंड पडला तर तुम्ही यावेळी एक किंवा दोन वेळा पाणी देऊ शकता. त्याचबरोबर नंतर कापूस पिकाला दहा ते बारा दिवसाच्या अंतरावर पाणी देऊ शकता. मात्र त्यानंतरही पावसावर अवलंबून पाणी द्यावे. त्याचबरोबर फुले धरणाच्या वेळी पाऊस आला नाही तर तुम्ही त्यावेळी देखील सहा ते सात दिवसा दरम्यान पाणी देऊ शकता. यावेळी पाणी दिल्यानंतर फुले लवकरच दुरडी मध्ये रूपांतर होतात. त्याचबरोबर दुरडी मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे तुमचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
कापूस पिकामध्ये तुम्ही कोण कोणती आंतरपीके घेऊ शकता.
कापूस पिकांमध्ये तुम्ही मूग, भुईमूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, अशा इत्यादी पिकांची आंतरपीक म्हणून तुम्ही कापूस पिकामध्ये लागवड करू शकता.
त्याचबरोबर कापूस पिकासाठी कीड व रोग नियंत्रण कसे करावे
कापूस पिकामध्ये जास्त प्रमाणात रस शोषक किडे पडतात. आणि अनेक वेळा पांढरे माशी किंवा तुडतुडे देखील कापूस पिकावर पडतात. त्याचबरोबर तुडतुडे, मावा, फुल किडे किंवा बोंड आळी यासारखी किडे कापूस पिकावर आढळतात. यामुळे तुम्ही कापूस पिकाची लागवड केल्यानंतर साधारणतः 30 ते 35 दिवसानंतर पहिली फवारणी करावी. या फवारणीसाठी तुम्ही तुमच्या कृषी सेवा केंद्रातून योग्य ती औषधे घेऊ शकता.Kapus lagavd sampurn mahiti
त्याचबरोबर नंतर सत्तर ते ८० दिवसाच्या दरम्यान तुम्ही दुसरी फवारणी करू शकतात. यावेळी देखील तुमच्या कापूस पिकावर कोणकोणत्या किडीचा प्रादुर्भाव आहे यानुसार तुम्ही फवारणी करू शकता. फवारणी करताना औषधे टाकण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवावे. त्याचबरोबर औषधे किती प्रमाणात टाकावी हे तुम्ही कृषी सेवा केंद्रात नक्की विचारावे.
सध्या कापूस पिकाला किती बाजार भाव मिळतो?
आष्टी या बाजार समितीत आज 91 क्विंटल ची आवक आली आहे. आणि या बाजार समितीत कापूस पिकाला कमीत कमी बाजार भाव हा 7000 रुपये मिळत आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 7600 मिळत आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण बाजार भाव हा 7300 रुपये मिळत आहे.
त्याचबरोबर मित्रांनो आज यावल या बाजार समितीत मध्यम स्टेपल या जातीच्या कापूस पिकाची बारा क्विंटल ची ओळख आली आहे. आणि या बाजार समितीत कापूस पिकाला कमीत कमी बाजार भाव हा 6275 रुपये मिळत आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 7110 रुपये मिळत आहे. आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 6540 रुपये मिळत आहे.
त्याचबरोबर काल सावरनेर या बाजार समितीत मध्यम स्टेपल या जातीच्या कापसाची 500 क्विंटल ची आवक आली होती. आणि या दिवशी कापूस पिकाला कमीत कमी बाजार भाव हा 7150 रुपये मिळाला होता. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 7100 मिळाला होता. आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 7000 मिळाला होता. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही सर्व जिल्ह्यातील बाजार भाव तुमच्या बाजार समितीमध्ये जाऊन पाहू शकता.Kapus lagavd sampurn mahiti