Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra: सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो आपण आज या बातमीमध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे? या योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतात? या योजनेचा अर्ज कसा करावा? या योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करता येतो का? संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ हा आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. त्याचबरोबर आता कुटुंबातील सर्वच नागरिकांना लाभ मिळावा यासाठी नवनवीन योजना देखील आणल्या आहेत. आणि या योजनेचा लाभ घेऊन गरीब कुटुंब आर्थिक दृष्ट्या मजबूत होत आहेत.
समाजामध्ये आज देखील काही तुरळक कुटुंबांमध्ये मुलींना मुलांच्या तुलनेत कमीच लेखले जाते. आणि याचमुळे शिक्षण घेताना देखील मुलीला कमी शिकवले जाते आणि मुलाला जास्त प्रमाणात शिकवले जाते. यामागील मुख्य कारण म्हणजेच शिक्षणासाठी मुलगा असो किंवा मुलगी पैसा हा लागतो. आणि हा पैसा मुलीवर का खर्च करायचा असा विचार करून आई आणि वडील मुलीला न शिकवता आपल्या मुलाला शिकवू असा विचार करतात. यामुळे या ठिकाणी देखील मुलीला कमीच लेखले जाते. परंतु आता मुलीचे शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
त्याचबरोबर या कॉम्प्युटर युगात मुलींना देखील मुलांनी एवढेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर मुलगी देखील आता कोणत्याही क्षेत्रात मुलापेक्षा कमी नाही. पोलीस भरती असो किंवा आर्मी भरती मुलींचे फॉर्म देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पडत आहेत. त्याचबरोबर एसटी ड्रायव्हर,, ड्रायव्हर, रेल्वे ड्रायव्हर, इंजिनिअर, डॉक्टर, वकील, शिक्षक, नेव्ही भरती, शासकीय कर्मचारी, संशोधक, हवामान अभ्यासक, रिपेरिंग सेंटर, ब्युटी पार्लर, गिरणी, शिलाई मशीन, घर बांधकाम, घर मॅनेजमेंट, हॉटेल, एखादा कोणताही छोटा-मोठा व्यवसाय, राजकारण, संगीत, क्रिकेट, हॉलीबॉल, खो-खो, टेनिस, बॅडमिंटन किंवा एखादा कोणताही खेळ अशा कोणत्याही पदव्या नाहीत की त्या पदवीवर मुलगी कार्यरत नाही.
आता मुलीही मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. यामुळे मुलींना देखील समाजात मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले आहे. आणि याच बरोबर आता मुलींना कमी पैशात शिक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार देखील कार्यरत आहे. यामुळे मुलींना अगदी कमी पैशात शिक्षण मिळावे यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आणली आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेऊन मुली देखील चांगलं शिकू लागले आहेत. परंतु योजनेचा अर्ज मुलींना दरवर्षी करावा लागणार आहे.Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra
परंतु अनेक वेळा घराची परिस्थिती खूपच बिकट असते. आणि या कारणामुळे मुलगी स्वतःहून शिक्षण करण्यापेक्षा एखादा व्यवसाय किंवा मजुरी करून घराला हातभार लावत असते. त्याचबरोबर मुलाचे देखील अशाच प्रमाणे एखाद्या वेळेस परिस्थिती असते त्यामुळे मुलाला देखील घरातील कामे करण्यासाठी तसेच घरातील पैसा टिकून राहण्यासाठी मजुरी करावी लागते. परंतु असे होऊ नये म्हणून सरकारने 18 वर्षा खालील मुलाने काम केले किंवा त्याला काम करावे लागले तर शिक्षा केली जाईल असा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कमी वयोगटातील मुलांना मजुरी करण्यापासून सरकारने थांबवले आणि शिक्षण किंवा त्याला जो छंद आहे तो छंद जोपासता आला.
चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की या योजनेचा मुख्य उद्देश?
1 या योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व मुलींना शिक्षण मोफत घेता येणार आहे. जेणेकरून सर्व घरातील मुली शिकल्या पाहिजेत..
2 शैक्षणिक गुणवत्ता असून देखील अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. असे होऊ नये म्हणून या योजनेअंतर्गत मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते.
3 मुलींचे वर्गातील प्रमाण कमी होऊ नये यासाठी देखील ही योजना खूपच कार्यरत आहे
4 तसेच राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारता येते.
5 या योजनेमुळे मुलीच्या समाजातील आदर वाढत आहे.
6 या योजनेअंतर्गत मुलीचा सामाजिक व आर्थिक विकास देखील होत आहेत.
7 त्याचबरोबर मुलींना त्यांचा गणवेश खरेदी करण्यासाठी देखील आर्थिक सहाय्य दिले जाते.
8 त्याचबरोबर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मुलींना मोफत वाहतूक मिळते.(म्हणजेच मुलींना शाळेत येण्यासाठी लागणारे बस किंवा रिक्षा याचा खर्च सरकार उचलत आहे)
9 त्याचबरोबर या योजनेअंतर्गत मुलींना हॉस्टेलवर फीस माफ देखील होते. त्याचबरोबर मेसचा खर्च देखील वाचतो.
10 या शिष्यवृत्तीमुळे मुलींना शिकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीची पात्रता काय असावी
मित्रांनो सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीची पात्रता खालील प्रमाणे दिलेली आहे.
- विशेष मागास वर्ग म्हणजेच (एस बी सी) किंवा विमुक्त जाती भटक्या जाती म्हणजेच (VJNT) किंवा अनुसूचित जाती (SC) या प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जाईल.
- त्याचबरोबर अर्ज करणारी मुलगी ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सरकारी किंवा अनुदानित किंवा विनाअनुदानित माध्यमिक शाळेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेत असावी.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या घरचे उत्पन्न हे एक लाख रुपयांच्या आत असावे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीकडे कोणकोणते आवश्यक कागदपत्रे असावीत संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
1 आधार कार्ड
2 शिधापत्रिका
3 रहिवासी प्रमाणपत्र
4 अर्जदार मुलीचा किंवा घरातील एखाद्या सदस्याचा ईमेल आयडी
5 घरातील कोणत्याही सदस्याचा मोबाईल नंबर
6 अर्जदार मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो
7 अर्जदार मुलीच्या मागील सलग्न अभ्यासक्रमा गुणपत्रिकेचा साक्षांकित प्रत
8 तहसीलदाराकडून घेतलेले वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
9 राष्ट्रीयकृत बँक बचत खाते पासबुकची एक झेरॉक्स प्रत
10 त्याचबरोबर शेवटचे प्रमाणपत्र म्हणजे प्रतिज्ञापत्र
वरील सर्व कागदपत्रे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीला लागतील.
त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra
मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर देखील अर्ध करू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या गावातील सीएसटी सेंटरवर भेट देऊन या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. या योजनेअंतर्गत अर्ज व इतर सर्व कागदपत्रे शाळेतील मुख्याध्यापिकांकडे जमा करावे. आणि त्यानंतर जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या योजनेचा ऑनलाईन अर्ज पाठवावा. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये जाऊन देखील या योजनेचा अर्ज करू शकता..
सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या मदतीने मुलगी आर्थिक भार कुटुंबावर पडून देणार नाही. त्याचबरोबर मुलीला दरवर्षी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत मोफत ड्रेस दिला जाईल. त्याचबरोबर मुलीला या योजनेअंतर्गत गावापासून चार ते पाच किलोमीटर लांब घर असेल तर मोफत प्रवास दिला जाईल. किंवा ज्या गाडीने प्रवास करतात त्या गाडीचे भाडे दिले जाईल..
योजना मुख्यमंत्री यांच्याकडून राबवली जात आहे आणि या योजनेचा लाभ घेऊन मुली जास्तीत जास्त सुशिक्षित होत आहे. त्याचबरोबर आता यावर्षी म्हणजेच 2024 साली शिंदे सरकारने सर्व मुलींना शिक्षण मोफत केले आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील लाखो मुली मोठ मोठ्या पदावर जाऊ शकतात आणि स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात. परंतु मित्रांनो या योजनेचा अध्यक्ष शासन निर्णय काढण्यात आलेला नाही यामुळे ही योजना कधी अमलात येईल हे सांगता येत नाही.
परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही योजना लवकरच अमलात येणार आहे. यामुळे राज्यातील सर्व मुलींना मोफत शिक्षण नक्कीच मिळणार आहे. त्याचबरोबर निवडणूक येणार असल्यामुळे राज्य सरकारकडून मुलींसाठी आणखीन काही योजना राबवल्या जातील अशी ही माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून मुलींना तसेच शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. त्याचबरोबर या सरकारने मागील बंद पडलेल्या योजना सुरू करून पुन्हा शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना लाभ देण्यास सुरुवात केली आहे. याच प्रकारे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना देखील पुन्हा मुलींना लाभ दिला जात आहे.Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra