zendu Lagavd News: झेंडू या फुलाची लागवड कशी करावी? लगेच पहा संपूर्ण माहिती

zendu Lagavd News: नमस्कार मित्रांनो, झेंडू हे फुल खूपच प्रसिद्ध फुल म्हणून ओळखले जात आहे. त्याचबरोबर झेंडू या फुलाची शेती आपल्या महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये केली जाते. त्याचबरोबर झेंडू या फुलाची शेती बाहेर राज्यात देखील चांगल्या प्रमाणात पिकवली जाते. त्याचबरोबर झेंडूचा उपयोग हा माळा करण्यासाठी, त्याचबरोबर एखाद्या व्यासपीठ सजवण्यासाठी, किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये सजावट करण्यासाठी, किंवा एखाद्या निरनिराळ्या रंगांमध्ये पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी झेंडू या फुलाचा वापर केला जातो.

आणि या कारणामुळे झेंडू या फुलाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. यामुळे अनेक शेतकरी झेंडू या फळबागाची लागवड देखील करत आहेत. त्याचबरोबर वर्षानुवर्ष झेंडू पुलापासून लाखो रुपये देखील कमवत आहेत. यामागील कारण म्हणजे झेंडू फुलाला जास्त फवारणी करण्याची आवश्यकता नसते. त्याचबरोबर खत टाकण्याची आवश्यकता नसते. झेंडू पुलावा केवळ पाणी दिल्यानंतर झेंडूची वाढ मोठ्या प्रमाणात होते. आणि त्याचबरोबर झेंडू फुलाचे भाव देखील आता मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

सध्या किरकोळ बाजारामध्ये झेंडूच्या फुलाचा एक किलोचा भाव हा शंभर रुपयांच्या आसपास आहे. आणि मुख्य बाजार समितीमध्ये झेंडूचे भाव हे 70 ते 80 रुपये किलो आहेत. यामुळे सर्वसामान्य शेतकरी झेंडू या फुलाची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना झेंडू फुलाची लागवड कशी करावी याबद्दल माहिती नसते. आणि तो शेतकरी झेंडू फुलाची लागवड करतो. यामुळे त्याला नुकसान देखील सहन करावी लागते. यामुळे तुम्ही चेंडू फुलाची लागवड करणार असाल तर ही माहिती संपूर्ण नक्की वाचा यामुळे तुम्हाला ची लागवड करून चांगला प्रमाणात नफा मिळेल.

झेंडू फुलाची लागवड ही थंड हवामान असल्यावर करावी. म्हणजेच झेंडू फुलाची लागवड ही पावसाळ्यामध्ये म्हणजेच जून जुलै ऑगस्ट या महिन्यात करावी. उन्हाळ्यामध्ये झेंडूची लागवड कोणीही करू नये. यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. यामागील कारण म्हणजेच थंड हवामान असेल तर झेंडूची वाढ व फुलाचा दर्जा मोठ्या प्रमाणात वाढतो. थंड हवा मध्ये झेंडूच्या फुलाचा आकार मोठा होतो. आणि झाडाचा आकार मोठा झाल्यामुळे झेंडूच्या झाडाला जास्त प्रमाणात फुले येतात.zendu Lagavd News

म्हणजेच मित्रांनो वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडू फुलाची लागवड करणे आवश्यक आहे. अनेक भागात झेंडू या फुलाची लागवड पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये तसेच उन्हाळ्यामध्ये देखील केली जाते. माहितीनुसार मित्रांनो, आफ्रिकन या झेंडूच्या जातीची लागवड ही फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये केली जाते. म्हणजेच मित्रांनो तुम्ही आफ्रिकन या झेंडू फुलाची लागवड ही फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर आणि जुलै महिना येईपर्यंत करू शकता. या काळात तुम्ही जर झेंडू फुलाची लागवड केली तर तुम्हाला ऑक्टोंबर महिन्यापासून ते एप्रिल या महिन्यापर्यंत झेंडूच्या फुलाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात निघते.

त्याचबरोबर एका अभ्यासात असे दिसून आले आहे की झेंडू या फुलाची लागवड सप्टेंबर महिन्यामध्ये केली तर या महिन्यात झेंडूपासून सर्वात जास्त उत्पन्न मिळते. झेंडू या फुलाची लागवड कोणत्याही जमिनीत केली जाते. म्हणजेच झेंडूची लागवड करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या मातीची निवड केली जाऊ शकते.

चला तर मग जाणून घेऊया की,  कोणत्या मातीमध्ये झेंडूची लागवड केल्यावर जास्त फुले येतात.. म्हणजेच जास्त उत्पन्न मिळते…

मित्रांनो झेंडूची लागवड करण्यासाठी तुम्ही सुपीक त्याचबरोबर पाणी धरून ठेवणारे आणि योग्य त्या प्रमाणात पाण्याचा निचरा करणारी जमीन निवडावी. या जमिनीमध्ये झेंडूच्या फुलाला मोठा आकार येतो आणि झेंडूपासून शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात नफा मिळतो. माहितीनुसार ज्या जमिनीचा सामू 7.0 ते 7.6 इतका आहे त्या जमिनीमध्ये झेंडू या पिकाला चांगल्या प्रमाणात उत्पन्न येते.

. त्याचबरोबर तज्ञांच्या एका रिपोर्टनुसार झेंडू या फुलाला बरोबर प्रमाणात सूर्यप्रकाश आवश्यक असतो. यामुळे तुम्ही वलसावलेला झेंडू फुलाच्या पिकाची लागवड करू शकत नाही. वलसावली म्हणजेच, एखादे चिंचेचे झाड आहे आणि त्या चिंचेच्या झाडाखाली सूर्यप्रकाश येत नाही. या सावलीला सावली असे म्हणतात. यामुळे लक्षात ठेवा की कोणत्याही मोठ्या झाडाखाली झेंडू या फुलाची लागवड करू नये. या ठिकाणी लागवड केल्यानंतर तुम्हाला उत्पन्न मिळणार नाही.

चला तर मग जाणून घेऊया कोणत्या झेंडूच्या जातीपासून किती उत्पन्न मिळते? त्याचबरोबर कोणत्या जातीचे झाड कशाप्रकारे वाढते?

आफ्रिकन झेंडू

आफ्रिकन झेंडू या फुलाची लागवड केल्यानंतर या झेंडूची झाडे उंच होतात.
त्याचबरोबर या झेंडूचे झुडूप कटक असते
त्याचबरोबर या जातीची झेंडूची झाडे पावसाळ्याच्या हवामानात 100 ते 150 सेमी पर्यंत उंच वाढतात.
या जातीच्या झाडापासून मिळणाऱ्या फुलाची रंग ही पिवळा, फिकट पिवळा किंवा नारंगी असू शकतो.
आफ्रिकन झेंडूमध्ये कोणकोणत्या जातींचा समावेश होतो हे आपण पुढील प्रमाणे पाहू यात(म्हणजेच आफ्रिकन जातीच्या उपजाती)…1 डबल 2 क्रॅकर जॅक 3 आफ्रिकन टॉलडबल 4 बेंगलोर लोकल 5 देशी सनराइज 6 आफ्रिकन 7 हॅलो सुप्रीम 8 हवाई 9 प स्पॅन गोल्ड 10 ऑरेंज

फ्रेंच झेंडू

फ्रेंच झेंडू या फुलाची वाढ कमी असते.
त्याचबरोबर या झेंडूची झाडे वाढतात.
या झाडांची उंची 30 ते 40 सेमी पर्यंत वाढते.
त्याचबरोबर या झाडांना येणाऱ्या फुलांचा आकार हा बारीक असतो
त्याचबरोबर या झाडाला अनेक रंगाची फुले येतात
या फ्रेंच झेंडू जातीमध्ये कोणकोणत्या उपजाती आहेत पुढील प्रमाणे पाहुयात… 1 येलो बॉय 2 हार्मोनी बॉय 3 बॉय कलर 4 बटर स्केच 5 रेड मारिटा 6 हर्मोनी रॉयल बेंगाल 7 क्वीन 8 सोफिया अशा इत्यादी उपजाती यामध्ये आहेत.

त्याचबरोबर झेंडू या फुलाची लागवड करण्यासाठी पूर्वतयारी कशी असावी…

झेंडूची लागवड करण्यापूर्वी तुम्ही लावणार आहात ते जमिनीची दोन ते तीन वेळा खोलवर नांगरट करून घ्यावी. आणि त्यानंतर त्या ठिकाणी वर आलेली धसकटे म्हणजेच पहिल्या पिकाची मुळे, काड्या, हरळी असे इत्यादी येथून शेताबाहेर फेकावे. त्यानंतर शक्य झाले तर हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. त्याचबरोबर या शेणखता तुम्ही पन्नास किलो नत्र, 200 किलो पुरंदर, आणि 200 किलो पालाश टाकून जमिनीत पूर्णपणे मिसळू शकता. आणि त्यानंतर झेंडूची झाडाची रोपे लावण्यासाठी साठ सेमी अंतरावर अंबे तयार करू शकता.

झेंडूच्या फुलाची लागवड कशी करावी

लागवड करण्यासाठी तुम्ही 60 सेमी अंतर वापरू शकता. त्याचबरोबर दोन रोपांच्या मधील अंतर हे 30 सेमी इतके असावे. म्हणजेच 60 बाय 30 सेमी अंतरावर झेंडू या फुलाची लागवड करावी. अशा पद्धतीने तुम्ही लागवड केल्यानंतर तुमच्या शेतामध्ये हेक्टरी 40 हजार रोपे लागतील. त्याचबरोबर लागवड करणे अगोदर तुम्ही मशागत केलेल्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी सोडावे. आणि त्यानंतर झेंडू या पिकाची लागवड करावी…

झेंडू या पिकाला पाणी व्यवस्थापन कसे करावे…

झेंडू पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते. आणि तुम्ही विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये झेंडू पिकाची लागवड केल्यानंतर, ज्यावेळेस अनेक दिवस पाऊस अंतर घेईल त्यावेळेस तुम्ही एक-दोन वेळा पाणी देऊ शकता. त्याचबरोबर दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने तुम्ही पाणी देऊ शकता.

आणि त्याचबरोबर तुम्ही जर हिवाळी हंगामामध्ये झेंडू या पिकाची लागवड करत असाल तर त्यावेळी तुम्ही झेंडू या पिकाला आठ ते दहा दिवसाच्या अंतरावर पाणी द्यावे. त्याचबरोबर तुम्ही जर उन्हाळी हंगामामध्ये झेंडू या पिकाची लागवड केली तर त्यावेळी तुम्ही पाच ते सात दिवसातच झेंडू या पिकाला पाणी द्यावे. झेंडू या पिकाला कळ्या लागल्या पासून फुले फुलांचा आकार मोठा होईपर्यंत झेंडू या फुलाला पाण्याची कमतरता लागू देऊ नका. तुम्ही जर यावेळी झेंडू या पिकाला पाण्याचा ताण दिला तर तुमचे उत्पन्न कमी होऊ शकते…

त्याचबरोबर अभ्यासानुसार झेंडू या पिकाची लागवड तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्हाला या पिकापासून हेक्टरी 12 टन ते १५ टन इतके उत्पन्न मिळू शकते. आणि त्याचबरोबर तुम्ही जर संकरित या जातीच्या झेंडूची लागवड केली तर तुम्ही प्रति हेक्टरी 18 ते 20 टन इतके उत्पन्न घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही झेंडू या पिकापासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतात….zendu Lagavd News

Leave a Comment